Advertisement

शासकीय दंत महाविद्यालयात सुरू होणार ओरल कॅन्सर विभाग


शासकीय दंत महाविद्यालयात सुरू होणार ओरल कॅन्सर विभाग
SHARES

सीएसटी येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात लवकरच ओरल कॅन्सर विभाग सुरू होणार आहे. हा कॅन्सर विभाग सुरू झाल्यानंतर येथील डॉक्टर फक्त रोगाचे निदानच करणार नाहीत तर सर्जरी आणि किमोथेरपी देखील करतील.


राज्य सरकारकडून 10 कोटींची मंजुरी

देशात कॅन्सरवर उपचार करणारे एकमात्र सरकारी रुग्णालय असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहून सरकारी आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. या नवीन ओरल कॅन्सर विभागासाठी राज्य सरकारने 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
सध्या शासकीय दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला ओरल कॅन्सरचे 25 से 30 रुग्ण येतात. पण योग्य उपचार मिळावा म्हणून त्यांना टाटा मेमोरियल रुग्णालयात पाठवले जाते.

शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी मुंबई लाइव्हला माहिती देताना म्हणाले, आम्ही आतापर्यंत 'मेडिकल ऑफिसर, तीन सर्जन, पाच नर्स, एक क्लार्क यांची भरती करून घेतली आहे. कॅन्सरवर उपचार करणाऱ्या अजून काही तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. याचसोबत आम्ही  टाटा मेमोरियल, जे जे, सेंट जॉर्ज या रुग्णालयांशी भागिदारी केली आहे. Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement