Advertisement

पालिका म्हणते, १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देणं कठीण

मुंबईत १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

पालिका म्हणते, १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देणं कठीण
SHARES

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांचं लसीकरण १ मे पासून होणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणीही सुरू होईल. पण असं असताना मुंबईत १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबईत कोरोना लसींचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील तरुणांना इतक्यात कोरोना लस देता येणं कठिण वाटत आहे, अशी भूमिका मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. आयुक्त यासंदर्भात राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे समजते.

१ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यास कोरोना लसींचा साठा कमी पडू शकतो. तसंच त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, असं इकबाल सिंह चहल यांचं म्हणणं आहे.

मुंबईसह देशातील चार बिगरभाजप राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे. आमच्याकडे कोरोना लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरु करु शकत नाही, असं या राज्यांनी केंद्राला कळवलं आहे. या चार राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवलं आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली होती.

मात्र, या लाटेनं उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे ३१ एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.हेही वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा