Advertisement

5 दिवसात डोळे येण्याच्या प्रकरणांमध्ये 5 पटीने वाढ

26 जुलैला हा आकडा 102 वर होता. ३१ जुलैला आकडेवारी 607 पर्यंत वाढ झाली आहे.

5 दिवसात डोळे येण्याच्या प्रकरणांमध्ये 5 पटीने वाढ
SHARES

पाच दिवसांत संपूर्ण शहरात डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये पाच पटीने वाढ झाली आहे. 26 जुलैला हा आकडा 102 वर होता. ३१ जुलैला आकडेवारी 607 पर्यंत वाढ झाली आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. या  वर्षात 31 जुलैपर्यंत राज्यात 80,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वातावरणातील बदलांमुळे डोळे येण्याच्या प्रमाणात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

खरं तर हा आजार एक प्रकारचं संसर्ग किंवा अॅलर्जी आहे. ज्या व्हायरसमुळे सहसा आपल्याला सर्दी होते, त्या व्हायरसमुळे हा आजार संभवतो.

“संसर्ग गंभीर नाही परंतु तो वेगाने पसरू शकतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, तर अॅलर्जीमुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होत नाही. डोळ्यांचा संसर्ग असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरी वेगळे करून विश्रांती घ्यावी,” असे अधिकारी म्हणाले.

“आम्ही संपूर्ण शहरात डोळे येण्याच्या घटना वाढत आहेत. आम्ही काही प्रकरणे पाहत आहोत, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा हवामान बदलते तेव्हा असे घडते,” पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शाह यांनी सांगितले.

पावसाळ्यात केसेस वाढतात

पावसाळ्यात डोळे येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होते कारण आर्द्रता जास्त असते, जी विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते, असे नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. निखिल सरदार यांनी सांगितले.

डॉक्‍टरांनी या वर्षी रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली असून, बाधित झालेल्यांपैकी 30-40 टक्के मुले आहेत. बहुतेक रुग्णांच्या डोळ्यांना लालसरपणा, सूज येणे, खाज सुटणे किंवा पाणी येणे अशा तक्रारी करत आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यात या वर्षी 31 जुलैपर्यंत सर्वाधिक (13,550) रुग्णांची नोंद झाली आहे, त्यानंतर पुणे (8,808), अकोला (6,125), अमरावती (5,539), धुळे (4,743), जळगाव (4,717), गोंदिया (4,209), नांदेड (4,113), वाशिम (3,997) आणि परभणी (3,718) रुग्णांची नोंद झाली आहे. 



हेही वाचा

नंदुरबार आणि पालघरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी

TMC मधील ३५ वर्षांवरील सर्व महिलांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा