Advertisement

मुंबईतील GT हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडर्सवर होणार व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया

ट्रान्सजेंडर समुदायावर उपचारासाठी विशेष सुविधा या रुग्णालयात सुरू केली आहे.

मुंबईतील GT हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडर्सवर होणार व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया
SHARES

मुंबईतल्या गोकुळदास तेजपाल (GT) हॉस्पिटलमध्ये आता सेक्स चेंज ऑपरेशन केलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींची व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शहरातील पहिले सरकारी हॉस्पीटल असेल जिथे ट्रान्सजेंडर व्यक्तींची अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे, थर्ड जेंडरसाठी स्वतंत्र वॉर्डची तरतूद केल्यानंतर हॉस्पिटलने हे पाऊल उचलले आहे. व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया सल्लामसलत दर मंगळवार आणि गुरुवारी हॉस्पिटलच्या ईएनटी विभागात केली जाईल.

डॉ नुपूर कपूर नेरुरकर, बॉम्बे हॉस्पिटलमधील ईएनटी सर्जन आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ट्रान्स व्हॉईस सर्जनची स्थापना केलेल्या 13 डॉक्टरांपैकी एक, शस्त्रक्रियांच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहेत.

पुरुष बनू इच्छिणाऱ्या ट्रान्स व्यक्तीचा, टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आवाज मर्दानी होतो. तथापि, जेव्हा पुरुषाला स्त्री बनायचे असते तेव्हा आवाज मोठा अडथळा निर्माण करतो. अशा परिस्थितीत आवाज बदलण्याची शस्त्रक्रिया हा एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे, असे डॉ कपूर यांनी स्पष्ट केले.

ट्रान्सजेंडर समुदायावर उपचारासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात शुक्रवारी ट्रान्सजेंडर वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. 30 खाटांचा हा वॉर्ड केवळ राज्याचाच नाही तर देशातील पहिला समर्पित ट्रान्सजेंडर वॉर्ड  आहे. 

मुंबईशिवाय राज्यातील इतर रुग्णालयांमध्येही असे वॉर्ड सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. ट्रान्सजेंडरना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. यासाठी राज्य सरकारने जीटी हॉस्पिटलमध्ये एक समर्पित वॉर्ड सुरू केला आहे. 

जेजे हॉस्पिटल ग्रुपच्या डीन डॉ. पल्लवी सापले यांनी सांगितले की, अनेकदा ट्रान्सजेंडर्सना महिलांच्या वॉर्डमध्ये दाखल करण्याची मागणी केली जाते. परंतु त्यांना महिला वॉर्डमध्ये दाखल करण्यास तेथील रुग्णांचाही विरोध असतो. पुरुष वॉर्डमध्ये ट्रान्सजेंडरना आरामदायी वाटत नव्हते. मात्र आता हा नवा वॉर्ड सुरू झाल्याने ट्रान्सजेंडर्सना मुख्य प्रवाहात आणता येणार आहे.

  • मानसोपचार तज्ज्ञ देखील इथे उपलब्ध असतील, असे डॉ.सापळे यांनी सांगितले. प्रवेशादरम्यान, सेरो निरीक्षणासाठी रक्ताचे नमुने घेतले जातील.
  • रूग्णालयात उपचारादरम्यान ट्रान्सजेंडर्सना वेगळ्या वागणुकीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करण्यासाठी, 150 हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर, आयसीयू मॉनिटरिंग, प्रशिक्षित कर्मचारी आणि डॉक्टर असतील.
  • रुग्णांची गोपनीयता राखण्यासाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष आणि ड्रेसिंग रूम असेल.
  • रुग्णांसाठी तटस्थ शौचालये असतील.



हेही वाचा

ठाणे : प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्यात येणार?

मुंबई: दादरमधील 'या' फार्मसीत औषधांवर 25% सवलत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा