Advertisement

जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर, अनेक शस्त्रक्रिया पोस्टपॉंड

रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर, अनेक शस्त्रक्रिया पोस्टपॉंड
SHARES

जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवार सायंकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वरिष्ठ डॉक्टरांकडून छळ होत असल्याचा आरोप या डॉक्टर्सनी केला आहे. याच कारणास्तव    बदलीची मागणी करत आहेत. 

निवासी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीही संप कायम ठेवल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले.

बाह्यरुग्ण विभागामध्ये निवासी डॉक्टर नसल्याने रुग्ण सेवेचा सर्व भार वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापकांवर पडला होता. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्ण सेवा बाधित होऊन रुग्णांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेक रुग्ण गर्दी पाहून घरी गेले.

तसेच अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून काही तातडीच्या शस्त्रक्रियाच करण्यात आल्या.

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवत आहेत.

त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, प्रथम वर्षांच्या निवासी डॉक्टरांचे वेतन आणि तृतीय वर्षांच्या निवासी डॉक्टरांची थकबाकी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन सुरू केले.

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मनमानी कारभाराविरोधात मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशन ज्युनियर डॉक्टर्स नेटवर्ककडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

डॉ लहाने आणि डॉ.पारेख यांच्यावर कठोर कारवाई करून निवासी डॉक्टरांचे भविष्य सुरक्षित करा, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन ज्युनियर डॉक्टर नेटवर्ककडून करण्यात आली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा