Advertisement

केईएम रुग्णालयात २४ तास सुरू राहणार शवविच्छेदन कक्ष

सध्या सायन, बीवायएल नायर, आरएन कूपर, केईएम, भगवती, राजावाडी, शताब्दी, सेंट जॉर्ज, जीटी आणि जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रे आठवड्याचे सर्व दिवस फक्त सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत कार्यरत असतात.

केईएम रुग्णालयात २४ तास सुरू राहणार शवविच्छेदन कक्ष
(Representational Image)
SHARES

परळ पूर्व इथल्या के.ई.एम रूग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रूग्ण दाखल होतात. इथं काही ठराविक आजारामुळे रुग्णाचे निधन झाल्यानंतर त्या शवाचे शवविच्छेदन करण्यात येते. या शवविच्छेदन कक्षाची वेळ ही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असते.

त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना शव ताब्यात मिळण्यास अनेकदा विलंब होतो. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक सचिन पडवळ आणि नगरसेवक अनिल कोकिळ यांनी शवविच्छेदन कक्ष हे २४ तास चालू ठेवावे, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती.

त्यानुसार केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेत वैदयकीय कायदेशीर जे शव असतील त्यांची वेळ ही दररोज सकाळी ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

तर अन्य आजारांच्या शवासाठीची वेळ संपूर्ण दिवसभर अर्थात २४ तास होणार आहे. १ एप्रिल २०२२ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल असं ठरवण्यात आलं आहे.

रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाला हे केंद्र चोवीस तास उघडे ठेवण्याची गरज भासू लागल्यानं, विशेषत: सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारामध्ये कोविड-संबंधित ७० टक्के प्रकरणे त्यांच्याकडे येतात आणि त्यांना फक्त प्रमाणपत्र आवश्यक असते.

केईएम रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाला दररोज सरासरी १५ ते २० मृतदेह मिळतात. सहा ते आठ शवविच्छेदन केले जातात ज्यापैकी दोन ते तीन अतिसंवेदनशील प्रकरणे आहेत.

२४x७ शवविच्छेदन केंद्राची नितांत गरज होती कारण यामुळे मृतदेह लवकरात लवकर हस्तांतरित करणे, नातेवाईकांना होणारा त्रास कमी करणे तसंच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करणे शक्य होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर केईएम रुग्णालयातील शवागारातील पायाभूत सुविधा सुधारणा करणे, केईएम शवागारमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे यावर देखील महत्वपूर्ण चर्चा झाली.

यावेळी केईएम अधिष्ठाता डाॅ.संगीता रावत, प्राध्यापक अतिरिक्त व विभाग प्रमुख प्र.न्याय वैद्यकशास्त्र विभाग डाॅ.रविंद्र देवकर, विकृती शास्त्र विभाग, शवविच्छेदन विभाग प्रमुख डाॅ. दक्षा प्रभात, डाॅ. गिरीश तासगांवकर व डाॅ. रचना चतुर्वेदी तसेच देवानंद कदम आणि बाळा मुगदार उपस्थित होते.

सध्या सायन, बीवायएल नायर, आरएन कूपर, केईएम, भगवती, राजावाडी, शताब्दी, सेंट जॉर्ज, जीटी आणि जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रे आठवड्याचे सर्व दिवस फक्त सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत कार्यरत असतात.



हेही वाचा

मुंबईत होम क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी का होतेय?

महाराष्ट्रात तुर्तास तरी मास्कमुक्ती शक्य नाही - राजेश टोपे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा