Advertisement

महाराष्ट्रात तुर्तास तरी मास्कमुक्ती शक्य नाही - राजेश टोपे

यूकेत मास्कमुक्ती करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र मास्क मुक्त (Mask Free Maharashtra) होणार का?

महाराष्ट्रात तुर्तास तरी मास्कमुक्ती शक्य नाही - राजेश टोपे
SHARES

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तुर्तास तरी मास्कमुक्ती शक्य नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. पण ते पुढे म्हणाले की, मास्कमुक्ती नाही पण लवकरच निर्बंध शिथिल केले जातील.

यूकेत मास्कमुक्ती करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र मास्क मुक्त (Mask Free Maharashtra) होणार का? असा प्रश्न काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. त्यावर राजेश टोपे यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

ते म्हणाले की, आज लगेचच महाराष्ट्र आणि देशात मास्कमुक्ती केली पाहिजे असं अजिबात नाहीये. पण यूके ने या संदर्भातील निर्णय का घेतला? त्याच्यामागचं शास्त्र काय आहे? पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केल आहे. हे का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. या संदर्भातील सर्व माहिती आपण संकलित करत आहोत. इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात तात्काळ मास्कमुक्ती करुन कुठलंही संकट ओढवायचं नाहीये. त्यामुळे तुर्तास मास्कमुक्ती शक्य नाहीये मात्र, निर्बंध शिथिल केले जातील. सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यातील 50 टक्के क्षमतेचे निर्बंध शिथिल करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल.

दरम्यान, कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र आहे. राज्य सरकारनं आधीच जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध हटवले आहे. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्यात जितकी संख्या वाढली होती, ती आता कमी झाली आहे.

नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे कल राहिलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली होती.हेही वाचा

डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत लसीकरणाचा वेग मंदावला

महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक होणार - राजेश टोपे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा