Advertisement

महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक होणार - राजेश टोपे

बुधवारच्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक होणार - राजेश टोपे
SHARES

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक (Maharashtra unlock) केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्यात जितकी संख्या वाढली होती, ती आता कमी झाली आहे.

कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याकडे कल राहिलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी चारदिवसांपूर्वीच राज्यात आता पुन्हा निर्बंध लावले जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. 'सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करू. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली. दरम्यान काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केली जाईल, असं टोपे म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी देखील फेब्रुवारी अखेरपर्यंत

दरम्यान संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, (Maharashtra) दिल्ली (Delhi) आणि पश्चिम बंगालसह (West Bengal) अनेक राज्यांनी त्यांच्या सक्रिय (Corona Active case) केस लोडमध्ये घट पाहायसा मिळथ आहे.

भारतातील सक्रिय (COVID-19) संख्या आता १४.३५ लाखांवर घसरली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे.

ICMR चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवीन रुग्णांची संख्या मूळ पातळीपर्यंत खाली येईल.



हेही वाचा

कोविड रुग्णांसाठी नेझल स्प्रे लाँच, ‘असा’ होणार फायदा

कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्यात संपणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा