Advertisement

डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत लसीकरणाचा वेग मंदावला

राज्यभरात लसीकरणाचा जोर कमी होत आहे.

डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत लसीकरणाचा वेग मंदावला
SHARES

राज्यभरात लसीकरणाचा जोर कमी होत आहे. डिसेंबरच्या तुलनेत तर जानेवारीमध्ये सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये तर यात आणखी घट झाली असून प्रतिबंधात्मक मात्रेच्या लसीकरणालाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळले आहे.

नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे राज्यभरात लसीकरणाचा जोरही कमी झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावलेला. परंतु ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या रूपाबाबत चर्चा सुरू झाली तसा लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तर प्रतिदिन सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले. परंतु जसजसे ओमिक्रॉनचे स्वरूप सौम्य झाले. त्यामुळे लसीकरणाचा वेग जानेवारीपासून पुन्हा कमी झाला आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे ५ लाख २५ हजार आणि ५ लाख ३८ हजार लसीकरण झाले होते. परंतु या तुलनेत डिसेंबरमध्ये मात्र लसीकरण वेगानं वाढले. त्यामुळे या महिन्यात सुमारे ६ लाख २४ हजार लसीकरण केले गेले.

जानेवारीत मात्र यात पुन्हा घट झाली आहे. जानेवारीमध्ये सुमारे ४ लाख ६९ हजार लसीकरण झाले असून डिसेंबरच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारीमध्ये पहिल्या पंधरवडय़ात दरदिवशी सुमारे दहा लाखांपर्यत लसीकरण केले जात होते.

परंतु जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून लसीकरणामध्ये घट होऊन हे प्रमाण सहा लाखांपेक्षाही कमी झाले. फेब्रुवारीमध्ये तर हे प्रमाण सुमारे साडेतीन लाखांपर्यंत घटले.

राज्यभरात पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे ९० टक्क्यांहून अधिक झाले असले तरी दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणाचे प्रमाण सुमारे ६७ टक्क्यांवर आहे.

राज्यातील १ कोटीहून अधिक नागरिकांनी नियोजित वेळ उलटून गेली तरी अद्यापही दुसरी मात्रा घेतलेली नाही. यात ९२ लाख कोव्हिशिल्डधारक तर सुमारे १७ लाख कोव्हॅक्सिनधारक नागरिकांचा समावेश आहे. दुसऱ्या मात्रेकडे पाठ फिरवणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर, बुलढाणा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.



हेही वाचा

रशियाच्या सिंगल डोसला भारतात मंजूरी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

कोविड रुग्णांसाठी नेझल स्प्रे लाँच, ‘असा’ होणार फायदा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा