Advertisement

रशियाच्या सिंगल डोसला भारतात मंजूरी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

स्पुतनिक लाइट ही भारतात मंजूर झालेली दुसरी सिंगल डोस लस आहे.

रशियाच्या सिंगल डोसला भारतात मंजूरी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये
SHARES

रशियाची सिंगल डोज कोरोना व्हॅक्सिन स्पुतनिक लाइटला भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे.

यासह, भारतात कोरोनाची लस म्हणून वापरासाठी मान्यता मिळालेली ही नववी लस ठरली आहे. स्पुतनिक लाइट ही भारतात मंजूर झालेली दुसरी सिंगल डोस लस आहे.

स्पुतनिक लाइट ही कोरोना विषाणूसाठी सिंगल डोस लस आहे. रशियानं ही लस तयार केली आहे. त्याचे घटक जवळजवळ स्पुतनिक V सारखे आहेत जी रशियाचीच डबल डोस व्हॅक्सिन आहे. स्पुतनिक V ला मे २०२१ मध्ये भारतात वापरण्यासाठी मान्यता देण्यात आली.

यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये, जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस कोरोना लस भारतात मंजूर करण्यात आली होती. जॉन्सन अँड जॉन्सन ही देखील स्पुतनिक लाइट सारखी विषाणूजन्य वेक्टर लस आहे.

स्पुतनिक V प्रमाणेच, स्पुतनिक लाइट ही लस रशियानं विकसित केली आहे. या दोन्ही लसी गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) यांनी संयुक्तपणे तयार केल्या आहेत.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, हैदराबाद, RDIF च्या सहकार्यानं भारतात स्पुतनिक लाइट लसीचे वितरण करतील.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने अलीकडेच गमलेया सेंटरमध्ये २८ हजार लोकांवर केलेल्या अभ्यासात स्पुतनिक लाइट लसीच्या परिणामकारकतेचे वर्णन केले आहे.

  • स्पुतनिक लाइटची कार्यक्षमता ७९.४% इतकी आहे. तर डबल डोस स्पुतनिक V ची कार्यक्षमता ९१.६% आहे.
  • डेल्टा प्रकाराविरूद्ध स्पुतनिक लाइट लसीची परिणामकारकता ७०% आहे.
  • ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये स्पुतनिक लाइटची परिणामकारकता ७५% आहे.
  • बूस्टर डोस म्हणून स्पुतनिक लाइटची डेल्टाविरूद्ध कार्यक्षमता स्पुतनिक V च्या दोन डोसच्या जवळपास आहे.
  • बूस्टर डोस म्हणून, डेल्टा संसर्गाविरूद्ध स्पुतनिक लाइट ८३% प्रभावी आणि हॉस्पिटलायझेशन रोखण्यासाठी ९४% प्रभावी आहे.
  • स्पुतनिक लाइट इतर लसींच्या संयोजनात वापरण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले.
  • RDIF च्या मते, अर्जेंटिनामधील प्रौढांमध्ये स्पुतनिक लाइटची प्रभावीता ७८.६-८३.७ होती.



हेही वाचा

महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक होणार - राजेश टोपे

कोविड रुग्णांसाठी नेझल स्प्रे लाँच, ‘असा’ होणार फायदा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा