Advertisement

मुंबईत होम क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी का होतेय?

मुंबईत दैनंदिन COVID-19 रुग्णांची संख्या दोन महिन्यांत प्रथमच २००च्या खाली गेली आहे.

मुंबईत होम क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी का होतेय?
SHARES

गेल्या १२ दिवसांत होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ७१ टक्क्यांनी घट झाली आहे. पण संस्थात्मक क्वारंटाईन प्रकरणांची संख्या कमी झालेली नाही.

१ फेब्रुवारीपर्यंत, महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १०,६९,५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये होते. जे १३ फेब्रुवारीपर्यंत ३,१३,४५७ पर्यंत घसरले. निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी, जागरूकता यामुळे संख्येत घट झाली आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषयी वाढती जागरुकता आणि राज्य प्रशासनाकडून लसीकरणाची वाढती संख्या यामुळे रुग्णांची संख्या कमी होत आहे.

महाराष्ट्रात दैनंदिन विषाणूच्या रुग्णांची संख्या १०,००० पेक्षा कमी आहे. गेल्या ३ दिवसांत दैनंदिन नोंदवलेल्या रुग्णांची संख्या ६,००० पेक्षा कमी आहे. दुसरीकडे, मुंबईत दैनंदिन COVID-19 ची संख्या प्रथमच २००च्या खाली गेली आहे.

सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी, शहरात १९२ रुग्ण नोंदवली गेली. १३ डिसेंबर २०२१ पासूनची सर्वात कमी एक दिवसाची संख्या, ज्यात १७४ कोरोनाचे रुग्ण आढळले.हेही वाचा

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख उतरता

१५ ते १७ वयोगटातील ५५ टक्केच किशोरवयीनांनी घेतली पहिली मात्रा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा