Advertisement

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख उतरता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्ण नोंद आहे.

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख उतरता
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णआलेख घसरला आहे. रविवारी २८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्ण नोंद आहे.

मुंबईत मृतांचे प्रमाणही कमी झाले आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत घसरली असून, सध्या एकही चाळ किंवा इमारत प्रतिबंधित नाही. शनिवारी दिवसभरात ३९ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यात बाधितांचे प्रमाण ०.७ टक्के आढळले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे मानले जाते.

मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन ०.०५% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील २४ तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तसंच आज नव्यानं सापडलेल्या २८८ रुग्णांपैकी ३५ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे पालिकेकडील ३६ हजार ८८९ बेड्सपैकी केवळ १ हजार ०२७ बेड वापरात आहेत.

राज्यात रविवारी ३ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत राज्यात ९ हजार ८१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या ४५ हजार ९०५ ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,४९,६६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात रविवारी १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६४,३७,४१६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७८,४२,९४९ (१०.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या २ लाख ९४ हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,३८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्रात तुर्तास तरी मास्कमुक्ती शक्य नाही - राजेश टोपे

डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत लसीकरणाचा वेग मंदावला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा