Advertisement

मासिक पाळीबद्दल लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन

आजच्या स्मार्ट आणि बोल्ड युगात तरुण पिढी मासिक पाळीविषयी आपलं मत सर्वांसमोर मांडताना दिसत आहे. यादरम्यान स्वच्छता कशी राखावी, सॅनिटरी पॅडविषयीची जनजागृती आणि त्याची विल्हेवाट या मुद्द्यांवर आज चर्चा होऊ लागली आहे. तरीही अनेक ठिकाणी याविषयी खूप समज-गैरसमज बाळगताना दिसत आहे. पण या सर्व बाबींना धुडकावून आजची नारी सर्वांच्या पुढे जाताना दिसत आहे.

मासिक पाळीबद्दल लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन
SHARES

गेल्या काही वर्षांमध्ये मासिक पाळी या विषयावर खुलेपणानं बोलणं सुरू झालं आहे. आजच्या स्मार्ट आणि बोल्ड युगात तरुण पिढी मासिक पाळीविषयी आपलं मत सर्वांसमोर मांडताना दिसत आहे. यादरम्यान स्वच्छता कशी राखावी, सॅनिटरी पॅडविषयीची जनजागृती आणि त्याची विल्हेवाट या मुद्द्यांवर आज चर्चा होऊ लागली आहे. तरीही अनेक ठिकाणी याविषयी खूप समज-गैरसमज बाळगताना दिसत आहे. पण या सर्व बाबींना धुडकावून आजची नारी सर्वांच्या पुढे जाताना दिसत आहे.


28 मे जागतिक मासिक पाळीदिनानिमित्त आपल्या दैनंदिन जीवनात मासिक पाळीबद्दल सकारात्मक बदल कसे झाले याबद्दल काही मुंबईकर महिलांकडून जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.


कल्पना शिंदेंची प्रतिक्रिया

आजची महिला "चूल आणि मूल" या दोन्हीही भूमिका सांभाळतात. पण या दिवसांत महिलेला बाकी सर्व गोष्टींपेक्षा आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. घरव्यतिरिक्त आम्हाला बाकी खूप कामं करायची असतात. मासिक पाळी हा शरीर घडणीचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे त्यात लाज किंवा कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही, असं मत मुंबईत राहणाऱ्या कल्पना शिंदे यांनी मांडलं आहे.


परवीन खान यांची प्रतिक्रिया

महिन्यातून एकदा महिलेच्या शरीरातून अशुद्ध रक्ताचा स्त्राव होऊन नव्याने आंतर्शरीर विकसित होत असते. या दिवसात महिलेने मानसिक आणि शारीरिक आराम घेणं गरजेचं आहे. काही वर्षांपूर्वी मासिक पाळीच्या पहिल्या पहिल्या दिवशी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पगारी सुट्टी मिळणार असं जाहीर झालं होतं, पण काही महिलांनी या निर्णयाचा विरोध करत नाराजी व्यक्त केली. हे असो. त्यापेक्षाही कठोर आणि त्रासदायक काम आम्ही करतो. तर एक दिवसाच्या पगारी सुट्टीचा आम्हाला "ओव्हर फेमिनिस्ट" नाही व्हायचं. या शिवाय आम्हाला आमची स्पेस ठेऊन काम करायला आवडेल, असं मुंबईकर परवीन खान सांगतात.


मासिक पाळीदरम्यान महिलेचं मूड स्विंग होत असतं. आजच्या पिढीला म्हणजेच पुरुषांना मासिक पाळीबद्दल आणि मासिक पाळीदरम्यान महिलांच्या होत असलेल्या मूड स्विंगबाबत माहीत असल्याने खूपदा पुरुष त्यांच्या चिडचिडेपणामध्ये रिऍक्ट न होता त्यांची समजूत काढताना आणि त्यांचा चिडचिडेपणा शांत करण्याचा प्रयत्न करतानाचं चित्र दिसतं असंही परवीन सांगतात.


ग्रामीण भागातही हा बदल आवश्यक

मेट्रोसिटी मध्ये सॅनिटरी नॅपकिनविषयी बरीच जनजागृती झालेली दिसून येते. ठिकठिकाणी आपल्याला सॅनिटरी नॅपकिन वेल्डिंग मशीन लागलेली दिसते. मात्र मासिक पाळीविषयीचा हा सकारात्मक बदल ग्रामीण भागातदेखील व्हायला हवा. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात लोकांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे. महिलांना याबद्दलची माहिती दिल्यास खऱ्या अर्थाने आपला देश आरोग्याच्या बाबतीत परिपूर्ण होऊ शकतं. कारण घरातील एक महिला निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी!


हेही वाचा - 

मासिक पाळीचा बागुलबुवा किती दिवस? लहान मुलींशी संवाद साधणं गरजेचं!

आता ५ रूपयांत सॅनिटरी नॅपकिन्स, 'अस्मिता'ला मंत्रिमंडळाची मंजुरी!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा