Advertisement

आता ५ रूपयांत सॅनिटरी नॅपकिन्स, 'अस्मिता'ला मंत्रिमंडळाची मंजुरी!


आता ५ रूपयांत सॅनिटरी नॅपकिन्स, 'अस्मिता'ला मंत्रिमंडळाची मंजुरी!
SHARES

महिलांची मासिक पाळी आणि त्या दिवसांतील सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर या विषयावर आता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय. महिला व मुलींमधील सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर वाढवण्यासाठी घोषित केलेल्या अस्मिता योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दरात मिळतीलच, शिवाय महिला बचतगटांना व्यवसायासाठी वाव मिळणार आहे.



अस्मिता ब्रँड असेल युनिक

अस्मिता योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी 1 कोटी रुपये वार्षिक खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन आता 5 रुपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. हे नॅपकिन आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला व मुली याचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ होईल. 'अस्मिता' हा ब्रॅण्ड सॅनिटरी नॅपकिनच्या पॅकेटवर छापला जाणार असून याची नक्कल कोणी करणार नाही, याची दखल घेतली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

आजपर्यंत सॅनिटरी नॅपकिन महाग असल्यामुळे, अंधश्रद्धेमुळे वापराचे प्रमाण अंदाजे 17 टक्के एवढे कमी होते. या योजनेमुळे स्वच्छतेबरोबरच आरोग्याच्या समस्या सुटण्यास मदत होऊन मुलींची शाळेतील उपस्थिती वाढेल.

पंकजा मुंडे, मंत्री, महिला व बालविकास


अस्मिता योजनेसाठी ॲप

राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिनचा वापर अधिक प्रमाणात होऊन महिला स्वयंसहाय्यता गटांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अस्मिता योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता गटांची सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी विशिष्ट मोबाईल ॲप तयार करण्यात येईल. तसेच, या ॲपद्वारे योजनेतील सहभागासाठी गावातील स्वयंसहाय्यता गटांची निवड करुन त्यामार्फत वेळोवेळी त्या गावातील महिलांना या ॲपवर एकत्रित मागणी करता येणार आहे. मागणी केल्याप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्स तालुका स्तरावरील वितरकांकडे उपलब्ध करुन देण्यात येतील.



हेही वाचा

प.रे.कडून महत्वपूर्ण पाऊल, महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पेन्सर्स


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा