Advertisement

प.रे.कडून महत्वपूर्ण पाऊल, महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पेन्सर्स


प.रे.कडून महत्वपूर्ण पाऊल, महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पेन्सर्स
SHARES

सॅनिटरी नॅपकिन्सवरचा जीएसटी कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडून मान्य झाली नसली, तरी मुंबईकर महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स डिसपेन्सर्सची व्यवस्था करून देण्यात आली आहे.


चर्चगेट स्थानकावर झालं उद्घाटन

डिसपेन्सर्सचं उद्घाटन २३ जानेवारी २൦१८ रोजी चर्चगेटच्या मुख्यालयात करण्यात आलं. (डब्ल्यूआरडब्ल्यूडब्ल्यूओ) या संघटनेच्या सहकार्याने हे सॅनिटरी नॅपकिन्स डिसपेन्सर्स महिला कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहेत.


६ विभागांमध्ये बसवले डिस्पेन्सर्स

फक्त मुंबईतच नाही, तर ६ डिव्हिजन्समध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये चर्चगेट, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर यांचा समावेश आहे. या मशिनमध्ये कॉईन टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्स महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष अर्चना गुप्ता यांनी महिला कर्मचाऱ्यांसह चर्चगेट स्टेशनवर या सुविधेचे उद्घाटन केले.



हेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा