मुंबईकर चाकरमानी सर्वाधिक तणावग्रस्त, आॅफिसच्या राजकारणाचा बळी


SHARE

मुंबईच्या लाईफस्टाईलला भाळून भारताच्या कानाकोपऱ्यातील असंख्य तरूण, प्रौढ या मायानगरीत दाखल होतात. इथं येऊन नोकरीधंदा करतात, आपापल्या कुवतीनं पैसा कमावतात. पण हे सारं करत असताना ही पिढी शरीराला क्षणाक्षणाला कुरतडणाऱ्या तणावाच्या विळख्यात कधी सापडते हे त्यांनाच कळत नाही. मुंबईतील तब्बल ३१ टक्के नोकरदार तणावाखाली काम करत असून हे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचा धक्कादायक अहवाल एका संस्थेने सादर केला आहे.

'लिब्रेट' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावरील मुंबईत ३१% टक्के, तर दिल्लीत २७% नोकरदार तणावग्रस्त असल्याचं नोंदवण्यात आलं आहे.


हृदयविकार जडण्याची भीती

मुंबईतील धावपळीचं जीवन, कामाचा अतिताण, ओव्हरटाइम, ऑफिसमधील राजकारण, वरिष्ठांचं वर्तन, त्यांच्याकडून न मिळणारं प्रोत्साहन, काम आणि घर यांच्यातील असंतुलन अशा विविध कारणांमुळे हृदयविकारासारखा आजार जडण्याची भीती असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.तणावग्रस्त त्यांचे कुटुंब आणि मित्रांशी नीट संवाद साधत नाहीत. तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भावना मित्र किंवा कुटुंबीयांकडे व्यक्त करण्याची गरज आहे. त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवायला हवी. दीर्घ कालावधीपर्यंत तणावाचा सामना केल्यास गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
- सौरभ अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक, लिब्रेट


'लिब्रेट' संस्थेने १० ऑक्टोबर २०१६ मध्ये वर्षभर विविध क्षेत्रांतील नोकरदारांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. डॉक्टरांच्या एका टीमने एक लाखांपेक्षा अधिक नोकरदारांशी चर्चा केली. त्यानंतर संस्थेने अहवाल तयार केला.


तणावाची मुख्य कारणं

  • अपुरा वेळ
  • दिलेले काम वेळेत पूर्ण करू न शकणं
  • मानसिक तणावाशी संघर्ष
  • ऑफिसमधील राजकारण
  • ओव्हरटाइम करणं
  • प्रोफेशनल आणि वैयक्तिक जीवनात संतुलन नसणंडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय