Advertisement

मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन सुसज्ज जंबो कोविड सेंटर होणार खुले

मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे जंबो कोविड सेंटर लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन सुसज्ज जंबो कोविड सेंटर होणार खुले
SHARES

मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे जंबो कोविड सेंटर लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कार्यान्वित करण्यात येणार आहे.

चुनाभट्टी इथल्या सोमय्या ट्रस्टच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या कोविड सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला.

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन चुनाभट्टी इथल्या सोमय्या ट्रस्टच्या सुमारे १८ हजार स्क्वेअर मीटर जागेत म्हाडाच्या वतीनं हे जंबो कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे.

या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच्या सर्व १२०० खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा आहे. याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे.

सेंटरमध्ये सुविधा कोणत्या?

  • सुमारे १८ हजार स्क्वेअर मीटर जागेत एकूण ८ युनिट
  • म्हाडाच्या वतीनं सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून सेंटर उभारण्यात आले
  • १०२४ खाटा ऑक्सीजन पुरवठा युक्त
  • अतिदक्षता विभागात एकूण २१० खाटा
  • लहान मुलांसाठी ऑक्सिजन आणि अतिदक्षता मिळून सुमारे २५० खाटा उपलब्ध
  • याच ठिकाणी सुमारे ४० किलो लिटर क्षमतेचा लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन प्लांट
  • अखंड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन जनारेटींग प्लांट
  • आपत्कालीन वापरासाठी प्रत्येकी १० लिटरचे ३०० ऑक्सिजन सिलेंडर तैनात

म्हाडाच्या वतीनं उभारण्यात आलेले हे सेंटर येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा खासदार शेवाळे यांनी व्यक्त केली.

या पाहणी दौऱ्यात खासदार शेवाळे यांच्यासह नगरसेवक रामदास कांबळे, डीन डॉ. सुजाता पोळ, अतिरिक्त डीन डॉ. रविकिरण गोळे, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत धात्रक, पालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. नामदेव तळपे, सोमय्या ट्रस्टचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.हेही वाचा

कस्तुरबा रुग्णालयातील ३७५ पैकी ३७% नमुने ओमिक्रॉनचे

नवी मुंबईत सोसायटीत थर्टी फस्ट पार्टी केल्यास गुन्हे दाखल होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा