Advertisement

नवी मुंबईत सोसायटीत थर्टी फस्ट पार्टी केल्यास गुन्हे दाखल होणार

शुक्रवार २०२१ या वर्षाचा अखेरचा दिवस असून, सर्वत्र थर्टीफस्टच्या तयारीला सुरवात झाली आहे.

नवी मुंबईत सोसायटीत थर्टी फस्ट पार्टी केल्यास गुन्हे दाखल होणार
SHARES

शुक्रवार २०२१ या वर्षाचा अखेरचा दिवस असून, सर्वत्र थर्टीफस्टच्या तयारीला सुरवात झाली आहे. मात्र सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने कठोर निर्बध लावली आहे. त्यामुळं या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

थर्टी फर्स्टनिमित्त सोसायटीच्या आवारात, गच्चीत नाचगाणं, दंगा करणं, जोरदार सेलिब्रेशन केलं जातं. पण आता हे केल्यास ते महागात पडू शकतं. कारण जर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन केलंत तर पोलीस कारवाई तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगरपालिका आणि पोलीसांकडून निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे दारु पिऊन धिंगाणा घालणं, मद्यपान करुन रस्त्यांवर गाडीने हॉर्न वाजवत राऊंड मारताना पोलिसांच्या तावडीत जर तुम्ही सापडलात तर थेट सरत्यावर्षात आणि येत्या नववर्षात जेलवारी घडू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा