Advertisement

अत्यंत दुर्मिळ घटना, जन्माच्या दुसऱ्या दिवशी आईमुळे बाळाला डेंग्यू


अत्यंत दुर्मिळ घटना, जन्माच्या दुसऱ्या दिवशी आईमुळे बाळाला डेंग्यू
SHARES

बाळ जन्माला येऊन दुसऱ्या दिवशीच त्याला डेंग्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. डॉक्टरांच्या मते ही खूप दुर्मिळ घटना आहे. आईला डेंग्यू झाल्यामुळे बाळाला डेंग्यू झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आहे.

कुर्ला येथे राहणाऱ्या तस्फिया शेख (३६) यांना अचानक खूप ताप आला. त्यावेळी त्या ३७ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. शिवाय, तस्फिया यांना ताप येत असल्याने गर्भातील बाळाच्या ह्रद्याचे ठोके देखील वाढत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. डॉक्टरांनी तस्फिया यांना तत्काळ सूर्या हॉस्पिटलमधील सिझेरियन विभागात हलवलं. दोन दिवसांनी तस्फिया यांनी मुलाला जन्म दिला. त्यावेळी त्याचं वजन २ किलो ९१ ग्रॅम एवढं होतं. त्यावेळेस बाळामध्ये कुठल्याही आजाराची लक्षणं आढळली नाहीत. पण, दुसऱ्या दिवशी त्याला ताप आला. त्याचदरम्यान बाळाच्या आईला डेंग्यूचं निदान झालं.    

बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला डेंग्यूची लागण झाली आणि वेळेवर त्याचं निदान आणि उपचार झाले नाहीत, तर ती आई आणि बाळासाठी खूप गंभीर बाब असते.


एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाल्यावर साधारणत: ५ ते ६ दिवसांत त्याची लक्षणं दिसून येतात. जन्मानंतर ४८ तासांत बाळाला ताप आल्याने आईला डेंग्यू झाल्याने त्यालाही डेंग्यूची लागण झाल्याचं लक्षात आलं. पण, आता बाळ आणि आई दोघंही सुखरुप आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

- डॉ. नंदकिशोर काबरा, सूर्या हॉस्पिटल


तस्फिया प्रसुतीसाठी ११ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल झाली होती. १३ तारखेला तिची प्रसुती झाली. लगेच १४ तारखेला बाळाला ताप आल्यामुळे आम्ही त्यांची टेस्ट केली. त्यावेळी बाळाची पहिली डेंग्यू टेस्ट निगेटीव्ह आली. त्या बाळाचा ताप उतरत नव्हता. त्यामुळे पुन्हा डेंग्यूची तपासणी केली ती पॉझिटीव्ह निघाली. 

बाळाचे प्लेटलेट काऊंट ९० हजारांपर्यंत (सर्वसाधारण प्लेटलेट काऊंट दीड ते चार लाख असतात) कमी झाले होते. डॉक्टर बाळाला तोंडातून लिक्विड ड्रॉप्स देत होते. पण, त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्याच्या शरीरातील प्लेटलेट्स गरजेपेक्षा जास्त कमी झाल्या. पण त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होत नव्हता. बाळाची स्थिती बाराव्या दिवसानंतर हळूहळू सुधारू लागली. उपचारासाठी ते बाळ हॉस्पिटलमध्ये १७ दिवस होतं. त्यानंतर २९ सप्टेंबरला त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहितीही डॉ. काबरा यांनी दिली. 

ही अत्यंत दूर्मिळ घटना असल्याची प्रतिक्रिया सूर्या हॉस्पिटलचे संचालक भूपेंद्र अवस्थी यांनी दिली आहे.



हेही वाचा -

'मिरॅकल बेबी', सूर्या हॉस्पिटलने वाचवलं २२ आठवड्यांच्या निर्वाणला!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा