Advertisement

'मिरॅकल बेबी', सूर्या हॉस्पिटलने वाचवलं २२ आठवड्यांच्या निर्वाणला!


'मिरॅकल बेबी', सूर्या हॉस्पिटलने वाचवलं २२ आठवड्यांच्या निर्वाणला!
SHARES

सांताक्रूझमधील सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा अविस्मरणीय कामगिरी करत २२ आठवड्यांच्या 'निर्वाण'ला जीवदान दिलंय. डॉक्टरांच्या मते 'निर्वाण' हा ‘मिरॅकल बेबी’ आहे.

२२ आठवड्यांच्या प्रसुतीला 'प्री मॅच्युअर डिलिव्हरी' किंवा वेळेआधी झालेली प्रसुती असं म्हणतात. १२ मे २०१७ ला ऋतिका बजाज यांना प्रसुतीपूर्व कळा सुरू झाल्या. डॉक्टरांना कळून चुकलं की आता ऋतिकाची प्रसुती करावी लागणार. त्यानुसार डॉक्टरांनी तिची प्रसुतीही केली.

पण २२ आठवड्यांच्या या बाळाचं वजन अवघं ६१० ग्रॅम एवढं होतं. त्याच्या डोक्याचा आकार २२ सेमी आणि लांबी केवळ ३२ सेमी होती. डॉक्टरांनाही या बाळाची काळजी होती. पण, शेवटी 'निर्वाण'ची जगण्याची इच्छाशक्ती मोठी म्हणून अजूनही तो सुखरुप आहे. त्याला जन्मल्यापासून व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. अखेर ४ महिन्यानंतर शुक्रवारी 'निर्वाण'ला सूर्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.


जन्मापासूनच निर्वाणची फुफ्फुसे अपरिपक्व  होती. त्याला १२ आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली. त्यापैकी ६ आठवडे तो व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या फुफ्फुसांचं प्रसरण व्हावं, यासाठी श्वसननलिके (ब्रिदिंग ट्युब)द्वारे इंजेक्शन्स देण्यात आली. या कालावधीत त्याला फुफ्फुसांभोवती हवा साचणे (न्यूमोथोरॅक्स) आणि मेंदूतील रक्तस्त्राव झाला होता. रक्त संक्रमण, डोळ्यांसाठी लेझर ट्रीटमेंट आणि हर्नियाची शस्त्रक्रियाही त्याच्यावर करण्यात आली. 

- डॉ. भूपेंद्र अवस्ती, संचालक, सूर्या चाइल्ड केअर




जन्माच्या वेळेस निर्वाणचं वजन ६०० ग्रॅम होतं. नंतर ते अचानक कमी होऊन ५०० ग्रॅम एवढं झालं. पण, आता ४ महिन्यांनी त्याचं वजन साडे तीन किलो एवढं झालं आहे. शिवाय, २२ आठवड्यांत जन्म झालेला निर्वाण हा देशातील पहिला मुलगा असल्याचं सूर्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा दावा आहे.

भारतात १३ टक्के बाळांची मुदतपूर्व प्रसूती होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच्या पुढची स्टेप आयव्ही ट्रिटमेंटं. हे सर्वात घातक आहे. पण, निर्वाण वाचल्यामुळे  आम्हाला खूप आनंद होत आहे, असेही डाॅ. अवस्ती म्हणाले.  


सूर्या हॉस्पिटलचा आतापर्यंतचा रेकॉर्ड

सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी २०११ साली २४ आठवड्यांच्या बाळाला वाचवलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये २३ आठवड्यांच्या बाळाचा जीव वाचवला आणि आता २०१७ मध्ये २२ आठवड्यांच्या बाळाचा जीव वाचवल्याचा दावा हॉस्पिटलने केला आहे. 



हेही वाचा -

13 वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या बाळाचा मृत्यू

हो...मी लग्नाआधीच आई झाले!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा