Advertisement

13 वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या बाळाचा मृत्यू


13 वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या बाळाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील 13 वर्षाच्या बलात्कार पीडित मुलीने शुक्रवारी बाळाला जन्म दिला. पण, दुर्देवाने ते बाळ रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास दगावले.

त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता, म्हणून त्याच्या जन्मापासूनच त्याला एनआयसीयू विभागात ठेवण्यात आले होते. त्याचे वजन 1.08 किलो एवढे होते. शुक्रवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान या बाळाला त्या मुलीने जन्म दिला होता. पण, रविवारी अवघ्या 48 तासांच्या आत त्या बाळाचा मृत्यू झाला.

ती मुलगी जेव्हा 27 आठवड्यांची गर्भवती होती तेव्हा, तिच्या कुटुंबियांनी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या मुलीला गर्भपाताची परवानगीही दिली. त्याच आदेशानुसार शुक्रवारी मुलीला सॅण्डहर्स्ट रोड येथील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी सिझेरियन करून तिचा गर्भपात न करता तिची डॉक्टरांनी प्रसूती केली.

खरेतर, 32 आठवड्यांमध्ये गर्भाची पुरेशी वाढ झालेली असते, त्यामुळे या मुलीची प्रसुती करण्यात आल्याचे जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले होते.

त्या बाळाच्या जन्मापासूनच त्याला एनआयसीयू विभागात ठेवण्यात आले होते. पण, रविवारी त्याचा मृत्यू झाला आहे. त्या मुलीला रविवारी सकाळपासून ताप होता. तिची रिकव्हरी झाली की, आम्ही तिला डिस्चार्ज देऊ. 

- डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुती विभाग प्रमुख

वडिलांचा मित्र असलेल्या एका तरुणाने या मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याने ही मुलगी गर्भवती झाली होती. या मुलीच्या पोटातील बाळ 27 आठवड्याचे झाल्यानंतर ती गर्भवती असल्याचे तिच्या आईवडीलांना कळाले होते.


हेही वाचा - 

31 आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला सर्वोच्च न्यायालयाची गर्भपाताची परवानगी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा