नवजात शिशु इन्टेन्सिव्ह केअर युनिटचं उद्घाटन

 Santacruz
नवजात शिशु इन्टेन्सिव्ह केअर युनिटचं उद्घाटन
नवजात शिशु इन्टेन्सिव्ह केअर युनिटचं उद्घाटन
नवजात शिशु इन्टेन्सिव्ह केअर युनिटचं उद्घाटन
नवजात शिशु इन्टेन्सिव्ह केअर युनिटचं उद्घाटन
See all

सांताक्रूझ - सांताक्रूझ पूर्व येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये नवजात शिशूंसाठी इन्टेन्सिव्ह केअर युनिटची सुविधा सुरू करण्यात आली. बालदिनानिमित्त या आरोग्य सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेद्वारे 150 नवजात बालकांना एकाच वेळी आरोग्य सुविधा मिळू शकतील. हा भारतातला सर्वात मोठा नवजात अतिदक्षता विभाग आहे. या वेळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते. दरवर्षी सुमारे 8 लाख नवजात बाळांचा भारतात मृत्यू होतो. या आकडेवारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर सूर्या हॉस्पिटलने नवजात शिशुंसाठी उपलब्ध केलेल्या या सुविधेचं मोल अधोरेखित होतंय.

Loading Comments