Advertisement

'या' ठिकाणी चाचणी नाही, तर प्रवेश नाही

मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

'या' ठिकाणी चाचणी नाही, तर प्रवेश नाही
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय, महापालिकेनं गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. परिणामी, गर्दीवर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं मॉल्स, पब आदी ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यानं यापुढे मॉल, पब, व्यापारी संकुल, लांब पल्ल्याची रेल्वे स्थानकं एसटीची बस स्थानकं आदी ठिकाणी अँटिजन चाचण्या केल्या जाणार आहेत, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबईत गुरुवारी तब्बल २८७७ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्येत दररोज ४०० ते ५०० रुग्णांची वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी आता चाचणी आणि लसीकरण वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसंच, वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मॉल्स, पब, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, रेल्वेस्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी प्रत्येकाची अँटिजन चाचणी करूनच प्रवेश दिला जावा, असं निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सध्या लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्यानं अशा प्रकारच्या चाचण्या केल्याशिवाय मॉल्स, पब, रेल्वेस्थानके व बसस्थानकांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आयुक्तांनी आरोग्य विभागासह विभाग कार्यालयांना बजावले आहे. अँटिजन चाचणीचा अहवाल १५ मिनिटांत मिळत असल्याने बाधित रुग्ण शोधणे सहज शक्य होईल, असा पालिकेचा विश्वास आहे. तसेच लसीकरणाची संख्याही अधिकाधिक वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.



हेही वाचा -

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा