Advertisement

महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी उगाच घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केलं आहे.

महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती
SHARES

महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी उगाच घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( maharashtra health minister rajesh tope) यांनी विधानसभेत केलं आहे. 

हेही वाचा- करोनाच्या संशयित रुग्णांसाठी ४ रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष

कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. आपण सर्वजण सुदैवी आहोत की महाराष्ट्राच्या (maharashtra) हद्दीत अद्याप कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. करोनाच्या २ संशयीत रुग्णांचे (coronavirus suspects) वैद्यकीय चाचणी अहवाल अजून यायचे आहेत. या रुग्णांवर डाॅक्टरांच्या निरगाणीखाली उपचार सुरू आहेत. कोरोना'च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १० खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

तसंच कोरोनाच्या फैलावाबाबत बोलायचं झाल्यास खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. जो हवेच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे शिंकताना, खोकताना नाका-तोंडवर रुमाल धरणे, अस्वच्छ हात तोंडाला न लावणे, सार्वजनिक ठिकाणी जाताना स्वच्छता पाळणे इ. खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागेल, असं टोपे (health minister rajesh tope) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा- 'या' करोनाबाधित देशांमधून ४ हजार प्रवासी मुंबईत

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (bmc commissionar) यांनी गुरूवारी तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीला आरोग्य अधिकारी, वाॅर्ड आॅफिसर आणि महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता (डिन) यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा