रुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, केईएमचे कर्मचारी संपावर


SHARE

रुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ४ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला अाहे. शुक्रवारी सकाळी   रुग्णांच्या दोन नातेवाईकांकडून रुग्णालयातील वॉर्डबाॅय अाणि सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली


नेमकं प्रकरणं काय?

गुरूवारी ३ जानेवारी संध्याकाळच्या सुमारास केईएममधील एका सुरक्षा रक्षकाकडून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. विजय नाटेकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर शुक्रवारी सकाळी सुमारास रुग्णांच्या दोन नातेवाईकांकडून रुग्णालयातील एका वॉर्डबाॅय अाणि सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांची कोणतीही चुक नसताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात येते. यासाठी रुग्णालयात कोणत्याही प्रकारची अलार्म सिस्टिम किंवा सिक्युरिटी ऑडीट नसल्यानं हे हल्ले वेळोवेळी वाढत चालले आहेत. त्यामुळ अशाप्रकारच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात या प्रमुख मागणीसाठी केईएमचे कर्मचारी संपावर गेले आहेत. 


गेल्या अनेक वर्षांपासून विविध सरकारी रूग्णालयातील नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची प्रकरणं वाढत आहे. या हल्ल्यात कर्मचारी जखमी होत असून रूग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अगोदरच कमी आहे. त्यामुळं याविरोधात केईएम रूग्णालयाच्या प्रशासनानं वेळीच ठाम उपाययोजना कराव्यात 

- सुर्यकांत पाटोळे, अध्यक्ष, केईएम कर्मचारी संघटना


या प्रकरणाबाबत केईएम कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्यासोबत बैठक अायोजीत केली अाहे. त्यामुळं याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच स्पष्ट होईल.

 - प्रवीण बांगर, डॉक्टर, केईएम रूग्णालय
संबंधित विषय
ताज्या बातम्या