Advertisement

हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस लाॅन्च

कोव्हिड-१९च्या रुग्णांची मदत करण्याकरिता पुणे येथील एसआयआयसी आणि आयआयटी कानपूरची इन्क्यूबेटी कंपनी नोक्का रोबोटिक्स प्रायव्हेट लि. ने हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस लाॅन्च केलं आहे.

हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस लाॅन्च
SHARES

कोव्हिड-१९च्या रुग्णांची मदत करण्याकरिता पुणे येथील एसआयआयसी आणि आयआयटी कानपूरची इन्क्यूबेटी कंपनी नोक्का रोबोटिक्स प्रायव्हेट लि. ने हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस लाॅन्च केलं आहे. हे अत्याधुनिक उपकरण कोव्हिड-१९ रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरत आहे.

नोकार्क एच २१० हे हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती गरज भागवत आहे. एचएफओटी (हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस) नेजल कॅनुलाद्वारे रुग्णांना आर्द्रतायुक्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपीमध्ये ओरल सक्शन देत कफ बाहेर काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गरम आणि आर्द्रतायुक्त गॅस एपिथिलियल म्युको-सिलिअरीदेखील वाढवते, त्यामुळे श्वासासंबंधी समस्या उदा. न्युमोनिया आणि डेलिरियम यांचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. एचएफओटीमध्ये कॅनुलाचा वापर केल्यामुळे रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलणे सोपं जातं आणि इंट्युबेशनमुळे रुग्णाला होणाऱ्या टॉमोफोबियाची जोखीमही कमी होते.

सर्वो ह्युमिडिफायरसह, नोकार्क एच २१० विशिष्ट नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीवर आॅक्सिजन पुरवठा करतं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने, नोकार्क एच २१०मध्ये सहज उपयोगासाठी ४.३ इंचाचं एक टच स्क्रीन इंटरफेस, उच्च आणि निम्न-दबावातील ऑक्सिजनसाठी इनपुट असलेलं इलेक्ट्रॉनिक एफआयओ २ कंट्रोल आणि एक टर्बाइनचे फ्लो जनरेटर आहे. या उत्पादनात सर्वसमावेशक हिटर आणि दोन तापमान सेंसर्सदेखील आहेत. या बहुगुणी उपकरणात एक ज्येष्ठ आणि पेडियाट्रिक मोडदेखील आहे. यामुळे आरोग्य सेवेतील व्यावसायिकांना वेग-वेगळ्या फ्लो रेटमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ अशा दोघांवरही वापर करण्याची मुभा मिळते.

हेही वाचा - स्काय फाऊंडेशन वाढवतंय पोलिसांचं मनोबल

नोक्का रोबोटिक्सचे सीईओ, निखिल कुरेले म्हणाले, “हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपीमध्ये अनेक फायदे मिळतात. उदा. ऑक्सिजन देण्याची स्थिती अधिक सुधारणे, इंट्युबेशन करण्याची गरज कमी करणं आणि टोमोफोबिक अनुभव कमी करणे इत्यादी. यामुळे व्यक्तीला सहजपणे श्वास घेण्यास मदत मिळते. श्वास घेण्याची मेटॅबोलिक कॉस्ट कमी करण्यासाठी निर्माण केलेलं नोकार्क एच२१० हे श्वासासंबंधी तीव्र आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना जास्तीत जास्त आराम देतं. सध्या दररोज कोव्हिड-१९च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बाजारात एचएफएनसी उपकरणांची मागणी वाढत आहे. नोकार्क एच२१०चा सर्वांगिण सर्वो ह्युमिडिफायर हा उपकरणातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हवेचा पुरवठा उत्तम तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीवर होईल, याची सुनिश्चिती होते. यामुळे एच२१० हे नियमित हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी उपकरणाच्या तुलनेत कार्यक्षमता आणि फायद्यांबाबत अधिक प्रगत सिद्ध होईल.”

सुविधा आणि वापर करण्यासाठी सहज बनवण्यात आलेल्या नोकार्क एच२१० उपकरणात ट्युब ब्लॉकेज/ डिसकनेक्शन, तापमान सेंसर अनप्लग झाल्यास, हीटर वायर अनप्लग झाल्यास एवढंच नाही तर रुग्णांनाही खूप जास्त किंवा खूप कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना अलर्ट अलार्म देण्यात आला आहे.

हेही वाचा - नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा