Advertisement

स्काय फाऊंडेशन वाढवतंय पोलिसांचं मनोबल

संस्थेच्यावतीनं पोलीस ठाण्यातील सर्वांना वैयक्तिक स्वच्छता किट प्रदान करण्यात आल्या आहेत.

स्काय फाऊंडेशन वाढवतंय पोलिसांचं मनोबल
SHARES

कोरोनामुळे गेल्या ५ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळं तसंच त्यासाठीच्या आवश्यक त्या बंदोबस्तासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या राज्यातील पोलिसांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळताना दिसत नाही. अशावेळी पोलिसांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत त्यांचं मनोबल वाढवत कल्याण-डोंबिवली येथील स्काय फाऊंडेशनच्यावतीनं वैयक्तिक स्वच्छता किट देण्यात आला.

स्काय फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते आणि युवा प्रोत्साहक बी. शामराव यांच्या पुढाकारानं या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. संस्थेच्यावतीनं डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलिस ठाणे आणि मुलुंड पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यामध्ये नुकतीच भेट देण्यात आली. संस्थेच्यावतीनं पोलीस ठाण्यातील सर्वांना वैयक्तिक स्वच्छता किट प्रदान करण्यात आल्या आहेत.

'एकिकडे लॉकडाऊनचा आणि कोरोना प्रसाराचा ताण असतानाच मधल्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सामाजिक माध्यमांतून मोठ्याप्रमाणात मुंबई पोलिसांवर अनावश्यक ताशेरे ओढण्यात आले होते. त्यातच कोरोनाकाळातील बंदोबस्तावेळी कित्येक पोलिस कोरोना पॉझिटिव्ह झाले. या सगळ्यांमुळं पोलिसांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळं त्यांचं मनोबल नेहमीच दृढ राहणं हे समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे. स्काय फाऊंडेशननं त्यामुळं एक छोटीशी सुरुवात म्हणून अशाप्रकारे पोलिसांना भेट देऊन त्यांना समाजाकडून आश्वासक दिलासा देत, आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी भावना व्यक्त केली', असं स्काय फाऊंडेशनच्या बी. शामराव यांनी म्हटलं.

'पोलिससुध्दा आपल्यासारखेच सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांनासुध्दा त्यांची कुटूंबे आहेत, मुले-बाळे आहेत. अशावेळी कोणत्याही कारणामुळे ते खचू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे. स्काय फाऊंडेशनने यासाठी एक छोटेसे पाऊल उचलले आहे. हळूहळू आम्ही अधिकाधिक पोलिस ठाण्यात जाऊन शहरातील पोलिसांना मानसिक आधार देण्याच्या प्रयत्न करणार आहोत', असंही त्यांनी म्हटलं.



हेही वाचा -

नॉनकोविड रुग्णांसाठी आता सहज उपलब्ध होणार रुग्णवाहिका

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा