Advertisement

कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला

८ राज्याच्या तक्त्यात महाराष्ट्र सर्वात खालच्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला
SHARES

दिवाळीनंतर मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होणारी वाढ लक्षात घेत राज्य सरकार व महापालिकेनं कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहे. काही दिवसांपूर्वीचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतची भीती व्यक्त केली. मात्र, असं असलं तरी ८ राज्याच्या तक्त्यात महाराष्ट्र सर्वात खालच्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली इथं दररोजच्या रुग्ण संख्येत १०० टक्के वाढ आहे. हरियाणा ५३ टक्के, पश्चिम बंगाल ८ टक्के वाढ आहे. या तुलनेत गुजरातमध्ये १४ टक्के घट, केरळ २८ टक्के, छतीसगड ५० टक्के, महाराष्ट्र ७६ टक्के अशी रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र, मृत्यूदर अजूनही महाराष्ट्रात सर्वाधिक २.४४, पश्चिम बंगाल १.७५  दिल्लीत १.२२, छतीसगड १.१५ असा असल्याचं समजतं.

पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणं गरजेचं आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणं गरजेचं आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढविणं आवश्यक आहे. एन्टीजेनचा निगेटिव्ह अहवाल आलेल्या पण लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून परत आरटीपीसीआर चाचणी करणे महत्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील ८ राज्यांची व्हीसीद्वारे मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी नीती आयोगानं देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केलं.

संबंधित विषय