Advertisement

मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या घटली

मुंबईत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या घटली
SHARES

मुंबईत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.  कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचं प्रमाण निम्म्यानं कमी झालं आहे. चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर खाली आलं आहे. 

मुंबईत एक महिन्यापूर्वी रोज चार ते साडेचार हजार चाचण्या होत होत्या. यामध्ये एक ते दीड हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र, आता रोज १o हजारांपेक्षा अधिक चाचण्या केल्या जात आहेत. यामधून २००० हजार ते २२०० रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. पालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवताना घरोघरी तपासणी, सर्वेक्षण यामध्ये रुग्ण आणि अतिजोखमीच्या संपर्कांचा शोध घेतला जात आहे.

ट्रेस काॅन्टॅक्टच्या माध्यमातून पालिका प्रशासन जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देत आहे. मुंबईथ २० सप्टेंबरपर्यंत १० लाख ४ हजार १७  चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ लाख ८४ हजार ३१३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मात्र यातील १ लाख ४७ हजार ८०७ रुग्ण बरे झाले आहेत.  

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत असले तरी त्यातील ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 



हेही वाचा -

कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात

नाकावाटेही दिली जाऊ शकते कोरोना लस, सीरमकडून ट्रायलला सुरुवात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा