Advertisement

ओला गरजूंना देणार मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स, पण...

ऑनलाईन कॅब (Online Cab) सर्विस देणारी कंपनी ओलानं (Ola) मोठं पाऊल उचललं आहे.

ओला गरजूंना देणार मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स, पण...
SHARES

ऑनलाईन कॅब (Online Cab) सर्विस देणारी कंपनी ओलानं (Ola) मोठं पाऊल उचललं आहे. Ola नं गरजूंना मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स (oxygen concentrators) देण्याची घोषणा केली आहे. कंपनी हे गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवेल, त्यासाठीही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

ओला अ‍ॅपवर काही बेसिक डिटेल्स देऊन, घरी मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स मागवता येऊ शकतात. एकदा डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर ओला तुमच्या घरापर्यंत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स पोहोचवेल.

ओला फाउंडेशननं गिव्ह इंडियासह भागीदारी करत मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देण्याचं सांगितलं आहे. हे सर्व ओला मोबाईल अॅपद्वारे शक्य होईल. ओला यासाठी युजर्सकडून कंसंट्रेटर्ससाठी कोणतेही पैसे घेणार नाही. कंपनी दिलेला ऑक्सिजन कंसंट्रेटर्स त्याची गरज संपल्यानंतर पुन्हा घेऊन जाईल.

या सर्विसची सुरुवात पुढील आठवड्यापासून बंगळुरू इथून होणार आहे. त्यानंतर ही सुविधा इतर शहरांमध्ये सुरू होणार आहे. सध्या बंगळुरूमध्ये ५०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्ससह ही सर्विस सुरू करण्यात येत आहे. तसंच येणाऱ्या काही काळात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वॅक्सिनेशनचाही खर्च करणार आहे.

ओलाचे को-फाउंडर भाविश अग्रवाल यांनी सांगितलं की, सर्वांना या कोरोना महामारीविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. आज आम्ही O2forIndia साठी गिव्ह इंडियासह भागीदारी करत आहोत. याच्या मदतीनं आम्ही गरजूंना मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर्स पोहोचवण्यासाठी मदत करत आहोत. ओला अ‍ॅप युजर्स कंसंट्रेटर्सची रिक्वेस्ट ओला अ‍ॅपमध्ये टाकू शकतात. एकदा रिक्वेस्ट व्हेरिफाय झाल्यानंतर ओला युजर्सच्या दरवाजापर्यंत कंसंट्रेटर्स पोहोचेल आणि गरज संपल्यानंतर तो परतही आणला जाईल. कंसंट्रेटर्स आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणताही चार्ज लागणार नाही.

उबरनं वॅक्सिनेशन ड्राईव्हला प्रोत्साहन देण्यासाठी, वॅक्सिन घेण्यासाठी वॅक्सिनेशन सेंटरवर जाणाऱ्या लोकांना फ्री राईडची घोषणा केली आहे. या सर्विस अंतर्गत लोकांना ३०० रुपयांपर्यंतच्या राईडसाठी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही.



हेही वाचा

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची घोषणा

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे काढावे लागले डोळे, जाणून घ्या काय आहे 'ब्लॅक फंगस'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा