उपनगरीय रेल्वे स्थानकात प्रवाशांना वेळेत प्रथमोपचार मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘वन रूपी क्लिनिक’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता प्रवाशांना आणखी चांगली सेवा कशी उपलब्ध होईल यासाठी वन रुपी क्लिनिककडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आठ स्थानकात प्रवाशांना मोफत ब्लड प्रेशरची तपासणी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, वाशी, वडाळा आणि मानखुर्द या स्थानकामधील ‘वन रुपी क्लिनिक’ मध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत ही मोफत रक्तदाब तपासणी होत असून दररोज जवळपास 400 प्रवासी या सेवेचा वापर करत आहेत.
मुंबईतील प्रवाशांपैकी 20 टक्के लोक हायपरटेन्सिव्ह असल्याचे उघड झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांनी ‘वन रूपी क्लिनिक’मधील मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन ‘वन रूपी क्लिनिक’चे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी केले आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही योजना 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा -
मानसिक आजारानं त्रस्त आहात? 'वन रुपी क्लिनिक'मध्ये या...