Advertisement

अखेर शाळेत घुसला कोरोना, विद्यार्थी आढळला कोरोनाग्रस्त

शाळा सुरू केल्याच्या काही दिवसातच एका शाळेतील विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचं उघड झालं आहे.

अखेर शाळेत घुसला कोरोना, विद्यार्थी आढळला कोरोनाग्रस्त
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं शाळा सुरू करण्यात आल्या. पण शाळा सुरू केल्याच्या काही दिवसातच एका शाळेतील विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे संबंधित शाळा ३ आठवड्यांसाठी बंद करण्यात आली आहे.  शाळा एक

परभणी जिल्ह्यातील एक शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तीन आठवड्यासाठी बंद करावी लागली आहे. पूर्णा तालुक्यातील गौर गावातील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अशा ६९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये आठवीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनानं ३ आठवड्यासाठी ही शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तर आरोग्य विभागानं, विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी केली आहे. विद्यार्थी वगळता घरातील सर्व व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी आणि नातेवाईकांच्याही चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या त्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.



हेही वाचा

नवी मुंबईत ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

शाळांमध्ये रस्ता सुरक्षा कार्यशाळांचा अभाव, रस्ते अपघातास कारणीभूत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा