केवळ 87 डॉक्टरच पुन्हा सेवेत

 Mumbai
केवळ 87 डॉक्टरच पुन्हा सेवेत

मुंबई - संप मागे घेऊन डॉक्टर पुन्हा सेवेत परततील, असे जाहीर करत मार्डने आपले आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितल्यानंतरही मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परतले नाहीत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उशिरापर्यंत फक्त 87 डॉक्टर्स सेवेत परतले आहेत. महापलिकेच्या रुग्णालयांमधील 310 डॉक्टर्स हे सुट्टीवर गेलेच नव्हते. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 400 निवासी डॉक्टर्स हे रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत.

महापालिकेच्या केईएम, शीव, नायर या तीन प्रमुख रुग्णालयांसह कुपर आणि 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये एकूण 1 हजार 863 निवासी डॉक्टर्स आहेत. यापैकी 310 डॉक्टर्स वगळता सर्व डॉक्टर्स सुट्टीवर जावून आंदोलनात सहभागी झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच मार्डच्या सूचनेनुसार केईएम, नायर, शीव रुग्णालयांसह कुपर आणि उपनगरीय रुग्णालयातील 87 डॉक्टर्स सेवेत परतले आहेत.

प्रत्येक रुग्णालयात पोलीस चौकी

महपालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. याची त्वरीत अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय रुग्णालयात अलार्म सिस्टीम बसवण्याच्या कामालाही सुरुवात झाली असल्याची माहिती प्रमुख रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये सध्या 773 महापालिकेचे सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक विभागाच्यावतीने 397 सुरक्षा रक्षक आणि तीन अधिकारी याप्रमाणे 400 सशस्त्रधारी जवान तैनात केले जाणार आहे. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये 1 हजार 296 सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आले आहे. सध्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसह दोनच नातेवाईकांना प्रवेश दिला जात आहे.

Loading Comments