Advertisement

'...हा तर माझा दुसरा जन्म'


'...हा तर माझा दुसरा जन्म'
SHARES

कॅन्सरच्या ट्रिटमेंटसाठी करण्यात येणाऱ्या केमोथेरेपीमुळे हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. याचे जीवंत उदाहरण म्हणजे युक्रेनवरून मुंबईत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आलेली सेनिआ...

32 वर्षीय सेनिआ हिला कार्डियोमायोपॅथी नावाचा म्हणजेच कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तिने केमोथेरपी घेतली. पण, याचा परिणाम तिच्या हृदयाच्या गतीवर झाला. त्यामुळे फोर्टिस रुग्णालयात तिच्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सेनिआच्या निमित्ताने फोर्टिस रुग्णालयात 50 वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

भारतात मिळालेल्या उपचारांमुळे माझा दुसरा जन्म झाला. मी पुढच्या आठवड्यात पुन्हा माझ्या घरी परतणार आहे. मी सगळ्या आशा हरपून बसले होते. पण, वैद्यकीय सेवेमुळे मी माझ्या घरी परत सुखरुप जाणार आहे.
सेनिआ शिहोल, रुग्ण

केमोथेरपीमुळे हृदयावर होणारा परिणाम नवीन गोष्ट नाही. जगभरात केमेथेरपीमुळे होणारे साईड इफेक्ट सर्वांना माहीत आहेत. सेनियाची गोष्टही वेगळी नाही.

- डॉ. स्वाती गारेकर, फोर्टिस रुग्णालय

एका अपघातात जयपूरमधील 17 वर्षांची मुलगी ब्रेनडेड झाली. तिला ब्रेनडेड घोषीत केल्यानंतर तिचे अवयवदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. कुटुंबीयांच्या निर्णयामुळे हृदय, लिव्हर आणि किडनी या अवयवांचे दान करण्यात आले. त्यामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे.

सेनिआ 18 मे पासून अवयवाच्या प्रतिक्षेत होत्या. त्या गेल्या 5 वर्ष उपचार घेत होत्या. त्यामुळे ही शस्त्रक्रिया फार महत्त्वाची आहे. आम्ही अवयवदात्या कुटुंबीयांसमोर नतमस्तक आहोत. मोठ्या कठिण प्रसंगी त्यांनी हा निर्णय घेतला. समाजात अवयवदानाबाबत जनजागृतीला सुरुवात झाली आहे.

- डॉ. अन्वय मुळे , कार्डियाक ट्रान्सप्लांट टीम प्रमुख, फोर्टिस रुग्णालय

जयपूरहून मुंबईला ग्रीन कॉरीडोरच्या सहाय्याने हृद्य आणण्यात आले. त्यानंतर ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया मुंबईतील 59 वी हृद्य प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. फोर्टिस रुग्णालयातील ही 50 वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होती.


हेही वाचा -

ज्येष्ठ नागरिकांसाठी चालता-फिरता दवाखाना



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा