Advertisement

ज्येष्ठ नागरिकांसाठी चालता-फिरता दवाखाना


ज्येष्ठ नागरिकांसाठी चालता-फिरता दवाखाना
SHARES

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी वामनराव मुंजारन विद्यालयाच्या आवारात नुकताच ‘क्लिनिक ऑन व्हील्स’ सेवा सुरू केली आहे.

‘क्लिनिक ऑन व्हील्स’च्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण सेवा तसेच वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. आठवड्याचे सहा दिवस सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे फिरते क्लिनिक उपलब्ध असणार आहे.

या दवाखान्यात रुग्णांच्या इसीजी, ब्लड आणि शुगरचे प्रमाण तसेच रक्तदाब यांच्या चाचण्या देखील करण्यात येणार आहेत. या दवाखान्यात प्रशिक्षित डॉक्टर तसेच नर्स उपलब्ध असतील.

गरज लागल्यास या दवाखान्यामार्फत रुग्णाला ऑक्सिजन देखील पुरवण्यात येईल. शिवाय दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरची देखील सुविधा देण्यात येईल. हा उपक्रम रुग्णालयतील तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.

वयस्कर वक्तींना वैद्यकीय सेवांचा घरच्या घरी लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या दवाखान्यात असणाऱ्या डॉक्टरांकडून वयस्कर व्यक्तींना उत्तम प्रकारची वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल. प्रशिक्षित टीम अशा ज्येष्ठांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सक्षम आहे. ही टीम या भागातील ज्येष्ठ नागरिकांना शक्य तितकी उत्तम आरोग्य सेवा पुरवेल.

- डॉ. श्रीनिवास ठाकूर, फोर्टिस रुग्णालय



या सेवेमुळे समाजातील मित्रांना घरच्या घरी आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. या मोफत सेवेद्वारे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला पोहचता येईल.

- डॉ. एस. नारायणी, झोनल डायरेक्ट, फोर्टिस रुग्णालय


हेही वाचा - 

ह्रदय दानच देईल आराध्याला जीवनदान


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा