ह्रदय दानच देईल आराध्याला जीवनदान

मुलुंड - अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला हृदयरोगाच्या आजाराने ग्रासलंय. या चिमुकलीचं नाव आराध्या मुळे असं आहे. गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, आराध्या ही रुग्णालयात दाखल नसून फक्त उपचारासाठी तिथे जाते.

तिचे वजन 13-14 किलो आहे. पण यामध्ये शस्त्रक्रियेसाठी कमीत कमी 30 ते 40 वजन असणे गरजेचे आहे. इतकच नाही तर आराध्यासाठी अजून ह्रदयदेखील मिळाले नाही.

आराध्याच्या घरची परिस्थिती उत्तम असली तरी या आजाराचा खर्च वाढल्यास रुग्णालयाने सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. तिची परिस्थिती अत्यंत नाजूक असून लवकरात लवकर शस्त्रक्रीया करणे गरजेचे असल्याचं फोर्टीस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं. जर तुम्ही आराध्याची मदत करू शकता तर जरूर करा.

Loading Comments