Advertisement

गर्भपाताविषयी प्रबोधनासाठी कार्यशाळेचं आयोजन


गर्भपाताविषयी प्रबोधनासाठी कार्यशाळेचं आयोजन
SHARES

आज समाजात कुणीही गर्भपातावर बोलत नाही. शिवाय बहुतांश महिलांना गर्भपाताविषयी फारसं माहीत नसते, आणि माहिती अभावी महिलांना गर्भपातासंधातील समस्यांना सामोरे जावे लागते. याच गर्भपाताविषयी महिलांचं प्रबोधन व्हावं यासाठी खास महिला पत्रकारांसाठी आशिया सेफ अॅबॉर्शन पार्टनरशिप, मुंबई प्रेस क्लब आणि ग्लोबल स्ट्रॅटर्जी यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. यावेळी गर्भधारणा आणि गर्भपात याविषयावर योग्य माहिती देण्यात आली.


याबद्दल दिली माहिती

१९७१ पासून एमटीपी(मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी) अधिनियमाखाली भारतात गर्भपात कायदेशीर ठरला असून देखील देशात हजारो स्त्रिया सुरक्षित गर्भपात सेवांचा वापर करण्यासाठी संघर्ष करत आहेत. 2015 मध्ये, भारतात झालेली किमान 0.8 दशलक्ष गर्भपात कदाचित असुरक्षित पद्धतींमुळे झालं. 

असुरक्षित गर्भपात महिलांच्या आरोग्यासाठी अनुचित जोखीम ठरू शकते आणि परिणामत: अनेक स्त्रिया आणि मुलींचं मृत्यू होऊ शकतात, अशी माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. गर्भपाताविषयी अनेक गैरसमज समाजात आहे आणि त्याच गोष्टी महिला गृहीत ठेवतात, त्यामुळे त्यांनां अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागतं. या कार्यशाळेदरम्यान नेमके कोणते गैरसमज आहेत आणि त्याबद्दल वैद्यकीय शास्त्र काय सांगते याबद्दल माहिती देण्यात आली.


यांनी केलं मार्गदर्शन

यावेळी फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्री अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय) चे माजी सचिव जनरल डॉ. नझर शेरीर, कोऑर्डिनेटर, एशिया सेफ गर्भपात भागीदारी सुचित्रा दळवी आणि जागतिक आरोग्य धोरणच्या वरिष्ठ आरोग्य संचालक डॉ इंदिरा बिहरा, यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा