Advertisement

'बेस्ट'च! १००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे.

'बेस्ट'च! १००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात
SHARES

बेस्टनं (BEST) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या १६ कर्मचाऱ्यांनी COVID 19 मुळे जीव गमावला आहे. पण या परिस्थितीत देखील एक दिलासादायक बातमी म्हणजे चालक आणि कंडक्टर १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करून बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून (Coronavirus) पूर्णपणे बरे झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे.

बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा (COVID 19) प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. आपलं कर्तव्य बजावताना अनेक बेस्ट कर्मचारी नागरिकांशी संपर्कात येतात. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका पत्करावा लागतो.

कोरोना बाधित कर्मचाऱ्यांसाठी बेस्टनं चांगलं काम केलं आहे. शिवाय बेस्टनं आपल्या संक्रमित कर्मचार्‍यांना खाजगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड मिळवून देण्यासाठी पैसे देखील भरले आहेत. तर रेमडेसिव्हिर सारखी औषधं वेळेवर मिळावीत म्हणून देखील बेस्ट तर्फे प्रयत्न करण्यात आले. त्यांना वेळेवर औषध मिळेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली.

“कर्मचाऱ्यांसाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न केले. अखेर आम्हाला त्यात यश मिळालं. रूग्णांना खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये भरती करण्यासाठी बेस्टनं स्वत:च्या तिजोरीतून खर्च केला आहे. संकटकाळात जीवनरक्षक रिमडेशिव्हर इंजेक्शनची व्यवस्था केली. तर कोरोनानं अस्वस्थ असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा मागोवा घेण्यासाठी एक COVID रिस्पॉन्स टीम तयार केली.” अशी माहिती बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल कुमार सिंघल यांनी दिली.

मागील आकडेवारीनुसार, बेस्ट कर्मचार्‍यांमधील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर ७० ते ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. बेस्टचे कर्मचारी बाळू सूर्यवंशी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरच त्यांचे कुटुंब देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बाळू यांनी जवळपास ३३ दिवस रुग्णालयात उपचार घेतले. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर ते घरी परतले.

“अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना अधिक धोका आहे. परंतु मी बेस्टचा ऋणी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी बेस्टच्या सेवेत कार्यरत राहिन,” असं TIO ला सूर्यवंशी म्हणाले.



हेही वाचा

उच्च वस्तीत आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये महापालिकेची जनजागृती मोहीम

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे 'इतके' आढळले रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा