Advertisement

मुंबई, ठाण्यात 'इतक्या' नागरिकांच्या शरीरात कोरोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज

मुंबई व ठाण्यात ३० टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांच्या शरीरात कोरोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई, ठाण्यात 'इतक्या' नागरिकांच्या शरीरात कोरोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, असं असलं मुंबई व ठाण्यात ३० टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांच्या शरीरात कोरोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तपत्रात याबाबत माहिती दिली असून, यामध्ये देशभरातील मेट्रोपोलीसच्या लॅबमध्ये चाचणी करणाऱ्या ४० हजार रुग्णांच्या डाटाचे विश्लेषण करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय खासगी प्रयोगशाळेच्या डाटानुसार परेल, भायखळा या भागात रहाणाऱ्या नागरिकांच्या शरीरात मोठया प्रमाणावर कोविड-१९ अँटीबॉडीज आढळल्या आहेत. उपनगरात बोरीवली, साकीनाका आणि मुलुंड या भागातही सिरो पॉझिटिव्हीटी ३९ आणि ३८ टक्के आढळली आहे.

सध्याच्या दिवसात रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यात या अँटीबॉडीज खूप महत्त्वाच्या आहेत. सध्या सुरु असलेल्या मानवी लस चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती किती प्रमाणात झाली, ते तपासले जाते.

ठाणे आणि मुंबईत सिरो पॉझिटिव्हीटी अनुक्रमे ३५ आणि ३० टक्के आहे. त्यानुसार, या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या. दिल्लीत २७ टक्के, चेन्नई २६ टक्के आणि कोलकातामध्ये २० टक्के सिरो पॉझिटिव्हीटी रेट आहे. मुंबई महापालिकेने टीआयएफआर सोबत मिळून पहिला सिरो सर्वे केला होता. त्यात झोपडपट्टीत रहाणारे ५७ टक्के आणि अन्य भागात राहणाऱ्या १६ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले होते. मुंबईतील मेट्रोपोलीस लॅबचा डाटा बारकाईने तपासला तर, परेल आणि मौलाना आझाद मार्गावरील (भायखळा, मुंबई सेंट्रल) ४४ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा