Advertisement

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीए

राज्यासह मुंबई दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीए
SHARES

दिल्लीत कोरोनाता प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात खबरदारी घेतली जात आहे. राज्यासह मुंबईत दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनानं याविषयी खबरदारी बाळगत खाटांची उपलब्धता, चाचण्यांची क्षमता वाढविली आहे. तसंच, दुसरीकडं कोरोनाचं संक्रमण वाढल्यास औषध व ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागानं दिली.

सध्या राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असून रेमडेसिवीर, टॉसिलीझूमॅबसारखी औषधेही मुबलक प्रमाणात असल्याची माहिती मिळते. राज्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दिवसाला १८ ते २३ हजारांच्या घरात रुग्ण आढळत होते. या काळात सक्रिय, गंभीर रुग्णांची संख्या वाढली. मोठ्या संख्येनं रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागली. दिवसाला ४०० ते ५०० टन ऑक्सिजनची गरज भासत असताना सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ती ८५० टनांवर गेली होती.

ऑक्सिजनची गरज ओळखून ऑक्सिजनच्या पुरवठ्याचं प्रमाण बदललं. आता ते  २०-८० टक्के असे आहे. औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजन तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येणार आहे. सध्या राज्यात औषध व ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास तुटवडा भासणार नाही. सध्याच्या घडीला राज्यात दिवसाला ४५० टन ऑक्सिजन लागत असून, सद्या ४०००हून अधिक टन ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नसल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा