Advertisement

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर वोक्हार्टमध्ये उपचार

विडात ही (६२) वर्षाची महिला सुदानहून थेट मुंबईत उपचारांसाठी आली. गेल्या २ वर्षांत तिच्या आजारावर अफ्रिका आणि इजिप्तमध्ये उपचार झाले होते. परंतु, तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला.

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर वोक्हार्टमध्ये उपचार
SHARES

'स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर' हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला कळणारच नाही की हा नेमका काय आजार आहे? पण, 'स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर' हा स्वादुपिंडाला होणारा कर्करोग आहे.

विडात ही (६२) वर्षाची महिला सुदानहून थेट मुंबईत उपचारांसाठी आली. गेल्या २ वर्षांत तिच्या आजारावर अफ्रिका आणि इजिप्तमध्ये उपचार झाले होते. परंतु, तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला.

मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर तिच्या वैद्यकीय चाचण्या केल्या असता तिच्या स्वादुपिंडाच्या टोकावर कॅन्सरची लागण झाली होती. आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा झाल्यावर त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या महिलेला काविळीमुळे त्रास होत होता. ही कावीळ कमी करण्यासाठी यकृतामध्ये स्टेण्टचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये आल्यावर आम्ही या महिलेची मेडिकल हिस्ट्री समजून घेतल्यावर तसंच सीटी स्कॅन केल्यावर 'स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर' हा दुर्मिळ कर्करोग झाल्याचं समजलं. हा फार दुर्मिळ प्रकारचा स्वादुपिंडाचा कर्करोग आहे. कॅन्सरचे निदान झाल्यावर आम्ही स्वादुपिंडाचा पुढील भाग, छोट्या आतड्याचा काही भाग, बाईल डक्ट (यकृताशी संबंधित भाग) गॉल ब्लॅडर हे अवयव काढून आम्ही स्वादुपिंड आणि पित्तनलिका लहान आतडी संबंधित जटिल पुनर्रचना केली असून तिच्या जिवाला आता कोणताही धोका नाही.

डॉ. इमरान शेख, एचपीबी शल्य विशारद, वोक्हार्ट हॉस्पिटल

तसंच, स्वादुपिंडाचा कर्करोग कमी जणांना होत असला, तरी झाल्यावर तो उशिरा लक्षात येतो. निदान होईपर्यंत तो पसरलेला असतो. याची शस्त्रक्रिया ही गंभीर आणि धोक्याची असते. बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर रुग्ण इतर उपाय करतात आणि डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. परंतु, एक-दोन आठवड्यांत कावीळ उतरली नाही, तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय चाचण्या करणं आवश्यक असतं. तंबाखू, मद्यपान, वाढते वजन, आनुवांशिकता, डायबेटिस, जीवनशैलीतील घातक बदल ही कारणं स्वादुपिंडातील कर्करोगास कारणीभूत ठरतात, असंही डॉ. शेख यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

स्मार्टफोन जास्त काळ वापरताय? मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता ४०० पट अधिक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा