जे. जे. रुग्णालय संप: रुग्णांनी घेतला धसका!

मुंबईतील जे. जे. रुग्णालय वैद्यकीय सेवेसाठी राज्यभरात प्रसिद्ध असल्याने या रुग्णालयात केवळ मुंबईच नव्हे, तर गावखेड्यातून रुग्ण येतात. परंतु सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे रुग्णालयात दाखल आणि उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना कोलमडलेल्या व्यवस्थापनाचा फटका बसत आहे.

  • जे. जे. रुग्णालय संप: रुग्णांनी घेतला धसका!
SHARE

सलग तिसऱ्या दिवशी जे. जे. रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच राहिल्याने रुग्णांच्या हालाला पारावर उरलेला नाही. या संपाला सायन आणि केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांनीही पाठिंबा दिल्याने तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत 'मार्ड'च्या प्रतिनिधींची बैठक निष्फळ ठरल्याने या तिन्ही रुग्णालयातील रुग्णांनी धसका घेतला आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालय वैद्यकीय सेवेसाठी राज्यभरात प्रसिद्ध असल्याने या रुग्णालयात केवळ मुंबईच नव्हे, तर गावखेड्यातून रुग्ण येतात. परंतु सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे रुग्णालयात दाखल आणि उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना कोलमडलेल्या व्यवस्थापनाचा फटका बसत आहे.


तीन दिवसांनी मिळाला रिपोर्ट

सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सीताबाई मोहिते आपल्या गर्भवती मुलीला चेक-अपचा रिपोर्ट घेण्यासाठी जे.जे. रुग्णालयात घेऊन आल्या. सलग ३ दिवस सुरू असलेल्या संपामुळे या दोघींना तीन दिवस रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या त्या एका रिपोर्टसाठी. मुलीला अशा अवस्थेत ठाण्याहून मुंबईला घेऊन येणं खूपच त्रासदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. डाॅक्टरांना झालेली मारहाण चुकीची असली, तरी त्यांनी इतर रुग्णांची व्यथाही समजून घेतली पाहिजे, अशी साधी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.डाॅक्टरांची भेट नाहीच

नांदेडवरून आपल्या पत्नीच्या पायावर उपचार करण्यासाठी आलेल्या सखाराम कदम यांनाही या संपाचा फटका बसला. दहिसरमध्ये आपल्या भावाकडे आठवड्याभरापासून राहणाऱ्या सखाराम यांना कशीबशी डाॅक्टरांची भेट मिळाली, त्यातच संप सुरू झाला. तीन दिवसांपासून प्रयत्न करूनही त्यांना डाॅक्टरांची भेट न मिळाली नाही. संप कधी मिटेल याची शाश्वती नसल्याने मुंबईत आणखी काही दिवस राहायचं की पुन्हा नांदेडला निघून जायचं याबद्दल संभ्रमात पडल्याचं त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

दुसरी बैठकही निष्फळ, जे. जे. रुग्णालयाचा संप 'जैसे थे'संबंधित विषय
ताज्या बातम्या