Advertisement

पालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ

कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिका क्षेत्रात आणि विशेषत: झोपडपट्टीसारख्या आव्हानात्मक परिसरांत जाऊन तपासणी करणाीऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनात 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

पालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ
SHARES

कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिका क्षेत्रात आणि विशेषत: झोपडपट्टीसारख्या आव्हानात्मक परिसरांत जाऊन तपासणी करणाीऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनात 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आरोग्य सेविकांना आता दरमहा 9 हजार रुपये मानधन मिळणार आहे.  

मुंबईत साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविका कार्यरत आहेत. त्यांनी आधी 5 हजार रुपये मानधन मिळत होतं. आता आरोग्यसेविकांचे मानधन चार हजार रुपयांनी वाढणार असून सप्टेंबरपासूनची थकबाकी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दिली जाणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

आरोग्यसेविकांचे मानधन 5 हजारांवरून 9 हजार रुपये करण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये सभागृहाने घेतला होता. प्रशासनाने त्याला मान्यता दिली होती. मात्र आठ महिने झाले तरी त्यांना हे मानधन मिळत नव्हते. त्यातच कोरोनाच्या लढाईत या सेविकांना घरोघरी पाठवून लोकांची माहिती घेणे, तपासणी करण्याचेही काम देण्यात आले होते. मात्र पालिका त्यांना कोणताही भत्ता, सुरक्षासाधने देत नव्हती. त्यातच काही सेविकांना करोना झाल्याचेही उघडकीस आले होते. त्यामुळे आरोग्यसेविका नाराज होत्या.

मानधन वाढवण्यासह लॉकडाऊन लागू झाल्यापासून आरोग्य स्वयंसेविकांनी जेवढे दिवस काम केले असेल, त्या प्रत्येक दिवसासाठी रुपये ३०० एवढे अतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. ही रक्कम देखील त्यांना मे महिन्यात दिल्या जाणाऱ्या एप्रिल महिन्याच्या मानधनासोबतच दिली जाणार आहे.


हेही वाचा -

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर

‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा