Advertisement

नायर रुग्णालयात 2 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी चाचणी यशस्वी

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्रतिपिंडे मिळवून त्यांचा कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी वापर करण्यात आला.

नायर रुग्णालयात 2 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी चाचणी यशस्वी
SHARES

नायर रुग्णालयात दोन कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी यशस्वी झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्रतिपिंडे मिळवून त्यांचा कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी वापर करण्यात आला. त्या दोन रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपी चाचणी यशस्वी झाल्याने नायर रुग्णालयात अन्य रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात येईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.  

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांवर गेली आहे. यातील 949 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 7,476 रुग्ण बरे झाले असून  21 हजार रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांची प्रकृतीही सुधारत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका सर्व प्रकारची काळजी घेत आहे. मात्र, याला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोना घाबरून न जाता प्रशासनाने घालून दिलेली बंधने पाळावी, असे आवाहन करतानाच आपण लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ असा विश्वासही आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जातो आहे.

चीनसह काही देशांमध्ये प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही कोरोना रुग्णांवर  प्लाझ्मा थेरपी वापरण्यास सुरूवात केली आहे.  यासाठी महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात  प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरू करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा