Advertisement

सायन रुग्णालयातही लवकरच प्लाझ्मा थेरपीची चाचणी

नायर रुग्णालयात दोन रुग्णांवर प्लाझा थेरपीची चाचणी यशस्वी झाली आहे. यानंतर अन्य रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात येत आहे.

सायन रुग्णालयातही लवकरच प्लाझ्मा थेरपीची चाचणी
SHARES

नायर रुग्णालयापाठोपाठ आता लवकरच सायन रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात दोन रुग्णांवर प्लाझा थेरपीची चाचणी यशस्वी झाली आहे. यानंतर अन्य रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीला रुग्णांचाही प्रतिसाद मिळत आहे.  

कोरोनावर मात करण्यासाठी पालिका आरोग्य विभागाकडून विविध उपचार पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग प्लाझ्मा थेरपी आहे. नायर रुग्णालयात सुरुवातीला दोन रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी होऊन हे रुग्ण बरेही झाले आहेत. नायरमध्ये ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता आणखी चार रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सायन रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. 28 दिवसांनतर कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाईडलाइनुसार ही चाचणी करण्यात येते. 



हेही वाचा -

वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा