Advertisement

फुप्फुसाच्या कर्करुग्णांत २० टक्क्यांनी वाढ


फुप्फुसाच्या कर्करुग्णांत २० टक्क्यांनी वाढ
SHARES

मुंबई - हवेतलं प्रदूषण आणि धूम्रपानामुळे पाच वर्षांत फुप्फुसाचा कर्करोग होणाऱ्यांच्या संख्येत २० टक्के वाढ झाली आहे. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ लंग कॅन्सर या संस्थेमार्फत झालेल्या अभ्यासातून हे चित्र स्पष्ट झालंय. ही संस्था कर्करोगाविषयी जनजागृती करते.

वाहनांमधून निघणारा धूर हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. परंतु यामुळे स्तनांचा कर्करोग होत असल्याचं अमेरिकेतल्या द सायलेन्ट स्प्रिंग इन्स्टिट्यूटच्या संशोधनात आढळलंय. त्यामुळे दर वर्षी जागतिक स्तरावर 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. 2015 मध्ये भारतात एक लाख दहा हजार जणांनी या कर्करोगामुळ प्राण गमावले होते. 2009 मध्ये 65 हजार, तर 2013 मध्ये 90 हजार जणांचा बळी गेला होता. त्यामुळे याचं प्रमाण 20 टक्‍क्‍यांनी वाढत असल्याचं स्पष्ट होतंय.

डिझेलच्या धुरामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो, त्यामुळे वाहन प्रदूषण टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस बस डे, सायकल डे, वॉकिंग डे असावे. यामुळे प्रदूषण कमी होईल, शिवाय इंधनाचीही बचत होईल. इंधन, फटाके, कारखाने आणि वाहनांतून निघणारा धूर, धूळ, विडी आणि सिगारेटचा धूर, शेतीत वापरली जाणारी रासायनिक खतं, प्राण्यांच्या मलमूत्रातून तयार होणार अमोनिया, यामुळे मोठ्या प्रमाणात हवेत प्रदूषण होतं. त्याचा पहिला फटका श्‍वसनसंस्थेला बसतो. त्यामुळे फुप्फुसाचा कर्करोग, हृदयरोग होतो, असे डॉ. उमा डांगी यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा