Advertisement

केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात कोविशिल्डचा डोस देण्याचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला.

केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण
SHARES

परळ येथील केईएम रुग्णालयात कोविशिल्डचा लस देण्याचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला आहे. केईएम रुग्णालयात ९५ स्वयंसेवकांना डोस देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुरूवातीला १०१ स्वयंसेवकांना कोविशिल्डचा दुसरा डोस दिल जाणार होता. मात्र, ६ जणांनी असमर्थता दर्शविल्यानं ९५ स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. 

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ९५ स्वयंसेवकांना दुसरा डोस दिल्यानं केईएम रुग्णालयातील कोविशिल्ड प्रक्रिया पूर्ण झाल्याचं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केलं. मार्च २०२१ पर्यंत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास त्यास निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे.

नायर रुग्णालयामध्ये पहिला डोस १४५ जणांना, तर दुसरा डोस १२९ जणांना देण्यात आला असून १६ जणांना डोस देणे बाकी आहे. लवकरच त्यांनाही दुसरा डोस दिला जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement