Advertisement

ओमिक्रॉनवर लवकरच लस उपलब्ध होऊ शकते

ही कंपनी खास करून ओमिक्रोनसाठी लस तयार करत आहे.

ओमिक्रॉनवर लवकरच लस उपलब्ध होऊ शकते
SHARES

भारताकडे कोविड १९ प्रतिबंधक पहिली मेसेंजर किंवा एम आरएएन (m RAN) लस लवकरच येण्याची शक्यता आहे. जीनोवा बायोफार्मास्यूटीकल या पुण्यातील प्रयोगशाळेनं तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ही कंपनी खास करून ओमिक्रोनसाठी लस तयार करत आहे.

पुण्यातील जीनोवानं दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा डेटा रेग्युलेटरी अप्रुव्हलसाठी दिला आहे. सार्स कोव २ व्हायरस डेल्टा व्हेरीयंट साठीच्या या दोन डोस लसीच्या एम आरएएन फेज दोनच्या चाचण्या ३००० लोकांवर घेतल्या गेल्या आहेत. आता चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण होत आहे.

रेग्युलेटरी अप्रुव्हल येईपर्यंत रिस्क मॅन्यूफॅक्चरिंग सुरू केलं गेलं आहे. रेग्युलेटरी बोर्डकडून परवानगी मिळण्यापूर्वी ही प्रक्रिया केली जाते.

ओमिक्रोन विरोधातील पहिली स्वदेशी लस कंपनीनं तयार केली आहे. मात्र त्याच्या मानवी चाचण्या व्हायच्या आहेत. या चाचण्या झाल्यावर प्रतिबंध क्षमता किती वाढते आणि लसीचा परिणाम समजू शकणार आहे. विशेष म्हणजे मेसेंजर प्लॅटफॉर्मचा वापर करून लस बनविली तर आगामी व्हेरीयंटनुसार लसीमध्ये बदल करणे शक्य असते. सेन्ट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या डेटाचे अध्ययन करणार आहे आणि मग त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रीय कोविड १९ कार्यप्रमुख डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार m RAN प्लॅटफॉर्मवर करोना लस बनवणं ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे देशात उपलब्ध असलेली कोल्ड चेन सुविधा पुरेशी ठरणार असून अन्य लसी याच प्लॅटफॉर्मवर तयार होऊ शकतील. त्या साठवण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार नाही.

ओमिक्रोनवर जगातील अनेक फार्मा कंपन्या लस बनवत आहेत. त्यात भारत बायोटेक बरोबरच मॉडर्ना, जेनसेन, सायनोफार्म, गामलिया, नोवावॅक्स, एस्ट्राजेनेका यांचाही समावेश आहे.



हेही वाचा

पालिकेनं उभारला मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, जाणून घ्या वैशिष्ट्ये

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राजेश टोपे म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा