Advertisement

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राजेश टोपे म्हणाले...

राज्यभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली होती.

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राजेश टोपे म्हणाले...
(File Image)
SHARES

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, येत्या १०-१५ दिवसांनी महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असल्यानं आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यानं हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय, कोविड-19 आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सर्व शाळा बंद करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला विरोध केल् जात आहे.

अंतिम निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

औरंगाबादमधील एका आमदारानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ज्यात त्यांनी दावा केला आहे की मुलांना शेतात काम करण्यास भाग पाडले जात आहे. तर मुलींचे त्यांच्या पालकांकडून लहान वयातच लग्न केले जात आहे.

एमएलसीनं मुख्यमंत्र्यांना ५० टक्के क्षमतेच्या शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.

"मुख्यमंत्री १५ दिवसांनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतील. जिथं प्रकरणांमध्ये वाढ होत नाही तिथे ५०% क्षमतेच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. तसंच शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील जोर धरत आहे. शाळा बंद असल्यानं मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,” असं टोपे म्हणाले.

संसर्ग वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करताना टोपे म्हणाले की, लोकांना कोरोनाची भीती वाटत नाही. COVID-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनी तसंच राजकारण्यांनी गर्दी करणं टाळावं.

यापूर्वी, राज्यभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे राज्य सरकारनं महाराष्ट्रातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली होती.हेही वाचा

MPSC परीक्षा 'या' तारखेला होणार

मुंबई महापालिकेचा 'या' विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा