मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी 8 हजार 074 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये पालिका रुग्णालयात 6 हजार 124 कोरोनाबाधित तर खासगी रुग्णालयात 1 हजार 227 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांपेक्षाही मुंबई महा पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चारपट असल्याचं दिसून येत आहे.
केईएम, सायन, नायर या तीन प्रमुख रुग्णालयांबरोबरच राजावाडी, कूपर, भगवती, शताब्दी , भाभा आदी सर्वसाधारण रुग्णालयांतही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसंच, पालिकेच्या अखत्यारितील सेव्हन हिल्स रुग्णालयातही कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सद्या पालिकेची रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली आहेत. या रुग्णांसाठी खाटा कमी पडत असल्याने पालिकेने आता खासगी रुग्णालयांची जागा, बेड ताब्यात घेणे सुरू केले आहे. तसेच बीकेसी, गोरेगाव येथे एक ते दोन हजार खाटांची क्षमता असलेली रुग्णालये उभारण्यात येत आहेत.
पालिकेने कोरोना बाधित रुग्णांबाबत दिलेल्या आकडेवारीवरून पालिकेच्या व खासगी रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1 ते 10 वयोगटातील रुग्णांची संख्य 481 आहे. त्यापैकी 155 जणांना डिस्चार्ज दिला आहे. 10 ते 29 वयोगटातील रुग्णांची संख्या 5 हजार 317 एवढी असून त्यापैकी 1 हजार 912 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच, 30 ते 49 वयोगटातील रुग्णांची संख्या ही 9 हजार 299 एवढी असून त्यापैकी 2 हजार 852 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर 50 ते 69 वयोगटातील रुग्णांची संख्या ही 7 हजार 131 एवढी असून त्यापैकी 1 हजार 583 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 70 वयोगटातील रुग्णांची संख्या 1 हजार 679 एवढी असून त्यापैकी 249 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या वयोगटात सर्वात जास्त रुग्ण हे 30 ते 49 वयोगटातील म्हणजे 9 हजार 299 एवढे आहेत. त्यापाठोपाठ 50 ते 69 या वयोगटातील रुग्णांची संख्या 7 हजार 131 एवढी आहे. तर सर्वात कमी रुग्ण संख्या ही 55 असून ती 10 वयोगटातील लहान मुलांची आहे.
हेही वाचा -
विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन
कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!